Sunday, March 16, 2014

`साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना’... (दैनिक सामना - २ आँक्टोबर २००१)





`साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना...अफगाणिस्तान व दहशतवादाविरोधातील लढाईत सामील होण्यासाठी अमेरिका जणू या गाण्याचे सूर आळवूनच जगातील सर्व राष्ट्रांना राजी करु पाहातेय. अफगाणिस्तानातील कारवाईमुळे कशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचे गमतीदार वर्णन युनिव्हर्सल छायागीत या ई-मेलधील गाण्यांमधून सध्या इंटरनेटवर वाचायला मिळते आहे. विनोदी शैलीचा हा चमकदार आविष्कार आहे. त्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख दैनिक सामनाच्या २ आँक्टोबर २००१च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना!

- समीर परांजपे.

`साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना...अफगाणिस्तान व दहशतवादाविरोधातील लढाईत सामील होण्यासाठी अमेरिका जणू या गाण्याचे सूर आळवूनच जगातील सर्व राष्ट्रांना राजी करु पाहातेय. अफगाणिस्तानातील कारवाईमुळे कशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचे गमतीदार वर्णन युनिव्हर्सल छायागीत या ई-मेलधील गाण्यांमधून सध्या इंटरनेटवर वाचायला मिळते आहे. विनोदी शैलीचा हा चमकदार आविष्कार आहे.
आशिष भंडारी या सन्मित्राने पाठविलेल्या या इ-मेलमध्ये अफगाणिस्तान संबंधाने देशादेशांतील तणावांबाबत उत्तम `गीतभाष्य केलेले आहे. त्याची ही पेशकश.
(१)    दहशतवादाविरुद्ध संघटित होण्याचे अमेरिकेचे जगाला आवाहन
गीतभाष्य – साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना,
एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना
(२)   अफगाणिस्तानातील कारवाईत सर्वप्रथम पाठिंबा देणारा अमेरिकेचा अव्वल चमचा म्हणजे ब्रिटन
ए मालिक तेरे बंदे हम
(३)   आर्थिक मदत दिल्यानंतरच अमेरिकेला सहकार्य करण्याची भूमिका पाकिस्तानने घेतली.
जो तुमको हो पसंद वही बात करेंगे,
तुम दिनको अगर कहो रात, रात कहेंगे,
देते ना आप साथ तो हम मर जाते कभी के,
पुरे हुए है अरमान जिंदगी के,
हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे,
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे.
(४)   पाकिस्तानने दिलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेने आभार व्यक्त केले.
तुम जो हमारे मीत ना होते, गीत ये मेरे गीत ना होते.
(५)  अमेरिकेबद्दल पाकिस्तानने समाधान व्यक्त केले.
पाकिस्तान : कभी रात दिन तुम दूर थे, दिन रात का अब साथ है,
अमेरिका  : ये भी इक्तेफाक की बात थी, यह भी इक्तेफाक की बात है.
(६)   पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेने तालिबानला धक्काच बसला.
बहारोंने मेरा चमन लूटकर,
फिजाँ को ये इल्जाम क्यों दे दिया,
किसी ने चलो दुश्मनी की मगर,
इसे दोस्ती का नाम क्यूँ दिया.
(७)  अमेरिकेला पाठिंबा देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता असा खुलासा पाकिस्तानने केला.
हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके.
(८)   अमेरिकी विमानांना इंधन भरु देण्याची सुविधा देण्यास भारत तयार झाला.
ओ गोरे गोरे बाँके छोरे, कभी मेरी गली आया करो.
(९)   आम्ही पाकिस्तानची मदत घेत आहोत याचा भारताबरोबरच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही असे अमेरिका म्हणाली.
ना तुम बेवफा हो, ना हम बेवफा है,
मगर क्या है, अपनी राहे जुदा है
(१०) ओसामा बिन लादेनला आमच्या हवाली करा असे बुश यांनी ओमरला सांगितले.
बुश : ए क्या बोलता तू?
ओमर : ए क्या मै बोलू?
बुश : सुन
ओमर : सुना
बुश : देता का ओसामा?
ओमर : क्या करेगा नही दिया तो ओसामा?
बुश : अरे मारेंगे, पिटेंगे, बाँम्ब बरसायेंगे, और क्या?
(११)  ओसामा बिन लादेनला ताब्यात देण्यास तालिबानने नकार दिला.
हमे तुमसे प्यार कितना, ये तुम नही जानते.
मगर जी नही सकते तुम्हारे बिना..
(१२)   लादेन कुठे आहे हे आम्हाला माहित नसल्याचे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने सांगितले.
अय्याया करु मै क्या सुकुसुकू
खो गया ओसामा सुकुसुकू...
(१३)  इराण, सौदी अरेबियाने संबंध तोडून तालिबानला तडाखा दिला.
कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातोंका क्या?
कोई किसी का नही ये झुठे नाते है, नातों का क्या?
सुख मे तेरे साथ चलेंगे, दु:ख मे सब मुख मोडेंगे,
दुनियावाले तेरे बनकर, तेरा ही दिल तोडेंगे,
देते है भगवान को धोखा, इन्साँ को क्या छोडेंगे?
(१४)  अमेरिकेने हल्ला केल्यानंतर तालिबानींनी विमानभेद क्षेपणास्त्रे डागली. मात्र अमेरिकेची विमाने खूप उंचीवरुन उडाल्याने, क्षेपणास्त्रांचा मारा त्यांना चुकविता आला.
मेरी अर्जी मान ले मौला,
तू है सबकुछ जाननेवाला,
मै हूँ तेरा माननेवाला,
अपनी फायरिंग लिफ्ट करादे,
थोडीसी तो लिफ्ट करादे.
(१५)  अफगाणिस्तानवरील हल्ल्याला मुस्लिम राष्ट्रांनीही पाठिंबा दिल्याने तालिबान त्रस्त झाले.
देखी जमाने के यारी, बिछडे सभी बारी बारी
(१६) अमेरिकेविरोधात ओसामा बिन लादेनने जिहाद पुकारला.
तुम हमको मारते हो?
हम तुमको मारते है?
हम अपने जिहाद का
ऐलान करते है.

---

No comments:

Post a Comment