Wednesday, March 19, 2014

वादाविना होणे नाही संमेलन... दिव्य मराठी - १२ जानेवारी २०१३




साहित्य संमेलनांमध्ये जशी अनेक अध्यक्षीय भाषणे आणि त्या-त्या प्रसंगी विविध विषयांवर करण्यात आलेले ठराव गाजले तसेच संमेलनाच्या निमित्ताने अध्यक्षपदाच्या निवडीवरून व अन्य साहित्यबाह्य कारणांनीही वादविवाद झडले. त्याचा प्रतिवादही तितक्याच जोरकसपणे करण्यात आला. यंदाचे संमेलनही त्याला अपवाद नाही. असे अनेक वाद अंगावर घेत साहित्य संमेलनाचा प्रवाह पुढे चालला आहे. संमेलनात आजवर जे महत्त्वाचे वाद झाले त्याचा ११ ते १३ जानेवारी २०१३ दरम्यान चिपळूण येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मी परामर्श घेतला होता. माझा हा लेख दै. दिव्य मराठीच्या १२ जानेवारी २०१३च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

वादाविना होणे नाही संमेलन...

- समीर परांजपे 

घालमोडय़ा दादास पत्र...
ग्रंथकाराच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्या म्हणूनन्या. रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी  १८७८च्या मे महिन्यात मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना केली आणि ११  मे १८७८ रोजी पुण्याला ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. या संमेलनात ज्यांच्या नावावर पाचपन्नास ग्रंथ होते व वयाने ज्येष्ठ असलेल्या लोकहितवादींना त्यावेळी या संमेलनाचे अध्यक्ष करणे सयुक्तिक होते. पण, तसे न करता न्या. रानडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तोवर एकही पुस्तक न लिहिलेल्या न्या. रानडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले ही चूक होती असा प्रचार करण्यास सुरुवात केली. २४ मे १८८५ रोजी न्या. रानडेंनी पुढाकार घेऊन ग्रंथकारांचे दुसरे संमेलन भरवले. या संमेलनात सहभागी होण्यासंबंधी १३ मे १८८५ रोजी महात्मा जोतिराव फुले यांना पत्र पाठवून विनंती केली होती. त्या पत्रास फुले यांनी पाठवलेले उत्तर ज्ञानोदयने ११ जून १८८५च्या अंकात छापले होते. फुले यांनीघालमोडय़ा दादासअसे संबोधून आयोजकांना फटकारे. तसेच संमेलनात सहभागी होण्याचे फुले यांनी स्पष्टपणे नाकारले...

लोकमान्य टिळक व साहित्य संमेलन
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी साहित्य संमेलन भरविण्यामध्ये मवाळ विचारसरणीच्या मंडळींचा पुढाकार असे. जहाल मताच्या मंडळींचा त्यात कमी सहभाग असे. म्हणूनच लोकमान्य टिळक साहित्य संमेलनांच्या वाटय़ाला फारसे गेले नाहीत. फक्त एकदाच म्हणजे १९०६मध्ये पुण्यास भरलेल्या साहित्य संमेलनास ते उपस्थित राहिले होते. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा घाट घालून जे दडपशाहीचे थैमान मांडले होते त्याची दखल साहित्यिक कशी घेतात हे त्यांना पाहायचे होते; मात्र साहित्याच्या अभिवृद्धयर्थ सरकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचे या साहित्य संमेलनातील ठराव बघून टिळकांना उबग आला. या साहित्य संमेलनात ज्यावर प्रचंड वादावादी झाली तो ठराव म्हणजे मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात मराठी या विषयाचा अंतर्भाव केला म्हणून त्याचे अभिनंदन करावे की निषेध करावा हा होता. मवाळ व जहाल विचारसरणीची मंडळी या ठरावाच्या निमित्ताने हमरीतुमरीवर आलेली असताना त्यातून मध्यम मार्ग काढायला न. चिं. केळकरांसारख्या व्यक्ती पुढाकार घ्यायच्या हे ओघाने आलेच. मुंबई विद्यापीठाचे अभिनंदनही करू नका व त्याचा निषेधही करू नका, असा मध्यम मार्ग केळकरांनी काढला आणि तो सर्वांनी मान्य केला. या प्रकरणावर लोकमान्य टिळक हसत हसत म्हणाले की, ‘ही गोष्ट बाहेर जाऊ देऊ नका’. यानंतर टिळक कधी संमेलनाकडे फिरकले नाहीत.

उद्भवला अत्रे-फडके वाद
रत्नागिरीला ना. सी. फडके यांनी अध्यक्षीय भाषणातून आचार्य अत्रे व तटणीस यांच्या पत्रनीतीवरून झोड उठवून मोठे वादळ उठवून दिले. आपल्या नूतन पत्नीच्या (कमल फडके) वेण्याफण्या, पावडर, अत्तर, स्नो व वेण्या यांचे बिल संमेलनाच्या कार्यकर्त्यांकडे ना. सी. फडके मागू लागले. तेव्हा अत्रे यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना बिथरवून फडक्यांची पंचाईत करून टाकली. त्यातून अत्रे-फडके वादाची धुळवड अनेक वर्षे रंगत राहिली.

अश्लीलताविरोधी ठरावाचा गोंधळ
संमेलनातील अश्लीलताविरोधी ठराव म्हणजे गदारोळ. ‘अश्लीलमार्तंडकृष्णराव मराठे १९३४ सालच्या बडोद्याच्या संमेलनापासून चिकाटीने तोच झेंडा घेऊन कार्यकर्त्यांना आणि साहित्यिकांना सळो की पळो करीत.

परिषदेचे स्थलांतर
मुंबईतील महाराष्ट्र साहित्य परिषद  पुणेकरांनी १९३२ मध्ये पुण्यात हलविली. या वेळी साहित्य परिषदेमध्ये वर्चस्व असलेल्या रावबहादूर दा. . पाध्ये यांच्या प्रयत्नाने परिषदेला संस्थानिकांकडून देणग्या मिळाल्याने देणगीदारांना संमेलनाचे अध्यक्ष बनविण्याचा प्रघात रूढ झाला. साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची चालकसंस्था. मात्र, तिला डावलून १९२१ ते १९३२ या कालावधीत पुणेकरांनी साहित्य संमेलने स्वतंत्रपणे भरविण्याचा चंग बांधला. पण, यश आले नाही. या साऱया वादात तत्कालीन कार्यवाह कृ. पा. कुळकर्णी परिषदेचे दप्तर समुद्रात बुडवावयास निघाले होते.

शिवसेनाप्रमुख आणि संमेलन
मुंबईमध्ये सन १९९९ मध्ये झालेल्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांनी संमेलनाचा उल्लेखबैलबाजारअशा शेलक्या शब्दात केला होता. तसेच या संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य वसंत बापट यांचा उल्लेखचपट बापटअसा केला होता. या उद्गारांमुळे संतप्त झालेल्या साहित्यिकांनी मग शिवसेनाप्रमुखांच्या उद्गारांचा खरपूस समाचार घेतला. पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना पु. . देशपांडे यांनी आपल्या भाषणात युती सरकारच्या कारभाराविषयी कोरडे ओढले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी पु. . यांचा उल्लेखमोडका पूलअसा केला होता. साहित्यिकांचा योग्य मान न ठेवल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्वच थरातून कडक टीका झाली होती. असे वाद अंगावर घेत साहित्य संमेलनाचा प्रवाह पुढे चालला आहे.

कादंबरीवरून गदारोळ
महाबळेश्वर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव हे त्यांच्या कादंबरीवरून झालेल्या वादामुळे या संमेलनास उपस्थित राहू शकले नव्हते. संत तुकाराम यांच्यावर आनंद यादव यांनीसंतसूर्य तुकारामही चरित्रात्मक कादंबरी लिहिली होती. त्यातील तुकारामांसंदर्भात यादव यांनी जे वर्णन केले होते त्याला वारकरी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला होता. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या जागी निदर्शने करण्याचा इशाराही देण्यात आला होता. डॉ. आनंद यादव यांनी संमेलनाचे अध्यक्षपद त्वरित सोडावे, अशी मागणी वारकऱयांनी केली होती. हे संतप्त वातावरण लक्षात घेऊन डॉ. आनंद यादव यांनी त्या संमेलनाला न जाणेच पसंत केले.

गेल्या दहा वर्षांतील वाद
- बेळगावला अध्यक्ष य. दि. फडकेंच्या सीमावादावरील वक्तव्याने तणाव झाला होता.
- पुण्यातील ७५व्या साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनच नको यामुळे वाद निर्माण झाला.
- कराडला निवडणूक धर्मादाय आयुक्तांकडे गेली. निकालाच्या विरोधात महामंडळाचे अपील.
- औरंगाबादला संमेलन सन्मान चिन्हांवरून वाद
- नाशिकला स्वागताध्यक्षांनी दिलेली बोकडाची मेजवानी आणि गोंधळ कार्यक्रम वादात सापडला.
- सोलापूरला खर्चाचा व बचतीचा वाद.
- नागपूरमध्ये वेगळा विदर्भ मुद्दा गाजला.
- सांगलीत ठाले-पाटील यांनीयशवंतराव चव्हाणांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ झाला.
- पुण्याचे संमेलन खर्चावरून गाजले.
- ठाण्याच्या स्मरणिकेतील नथुराम गोडसेंच्या उल्लेखावरुन वाद.



No comments:

Post a Comment