Friday, March 7, 2014

दादासाहेब फाळके मार्ग

मुंबईतील दादर पूर्व भागामध्ये दादासाहेब फाळके मार्ग आहे. त्या मार्गाला दादासाहेब फाळके यांचे नाव देण्यामागे काय अौचित्य होते याचा आढावा घेतलेला हा लेख मी दै. दिव्य मराठीच्या २ मे २०१२च्या अंकात लिहिला होता. दादासाहेब फाळके मार्गावर पूर्वी अनेक चित्रपट स्टुडिअो होते. या मार्गावरील एका इमारतीत दस्तुरखुद्द दादासाहेब फाळकेंनी आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. या सर्व ऐतिहासिक गोष्टींचा मागोवा या लेखात घेतला होता. 
-------
 दादासाहेब फाळके मार्ग
-----------------
- समीर परांजपे 
------
Email Print Comment
भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ चा पहिला खेळ 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्याचे द्वार त्या दिवसापासून खुले झाले. या घटनेच्या शताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ झाला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी अथक परिश्रमांती हे भव्यदिव्य यश साकार केले, त्याच मार्गाने पुढे जाऊन भारतीय कलावंत, दिग्दर्शक, संगीतकार व अन्य तंत्रज्ञांनी त्रिखंडात कीर्ती संपादन केली. दादासाहेब फाळके यांचा हा ‘पथदर्शी’ जीवनालेख न्याहाळत असताना स्वाभाविकपणे मुंबईच्या दादर (पूर्व) विभागातील दादासाहेब फाळके मार्ग व तेथील ‘मथरा भुवन’ (दादासाहेब फाळकेंच्या काही चरित्रग्रंथांमध्ये या वास्तूचे नाव ‘मथुरा’ भुवन असे दिले आहे. मात्र ते चुकीचे आहे. कारण ‘मथरा भुवन’ असे लिहिलेली संगमरवरी पाटीच तेथील नागरिकांनी अधिकृतपणे या वास्तूच्या बाहेर लावली आहे.) ही वास्तू मनात रुंजी घालू लागते. मंतरलेले दिवस पाहिलेला हा सारा परिसर आता चित्रनिर्मितीबाबत एकदम उदासवाणा होऊन गेला आहे.
दादरचा विजयनगर रेल्वेपूल ओलांडून पूर्वेला आले की उजव्या हाताला वळून सरळ सात मिनिटे चालत गेले की लागते तीच प्रसिद्ध ‘मथरा भुवन’ ही वास्तू. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचे बरेचसे इनडोअर शूटिंग याच वास्तूतील ‘बंगल्यात’ केलेले होते. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक वास्तू होती. ‘होती’ म्हणण्याचे कारण असे की हा ‘बंगला’ मोडकळीस येऊन 1977 मध्ये त्या वास्तूचा एक भाग कोसळला. त्यानंतर ‘म्हाडा’ने ही वास्तू ताब्यात घेतली व हा ‘बंगला’ तोडला.
‘मथरा भुवन’ या वास्तूतील लोखंडी गंजलेल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या व डाव्या हाताला एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या एकमजली दोन जुन्या चाळी लागतात. या चाळींचे आयुष्यमान तब्बल 120 वर्षांहून अधिक आहे. या चाळींच्या शेवटी आडव्या ओळीत एक हवेलीवजा दोन मजल्यांची चाळच होती. त्याचाच उल्लेख दादासाहेब फाळके, त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके, तसेच दादासाहेबांचे चरित्र लिहिणाºयांनी ‘बंगला’ असा केला आहे. उत्तम कॅमेरामन असलेल्या दादासाहेब फाळके यांनी 1905 मध्ये भारत सरकारच्या आर्किऑलॉजिकल खात्यातील ड्राफ्ट्समन फोटोग्राफर पदाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनाने मुद्रण व्यवसायामध्ये काही उत्तम कामगिरी करण्याचे मनावर घेतले. 1906 मध्ये थोडेफार जुजबी भांडवल जमवून त्यांनी लोणावळा येथे ‘फाळकेज आर्टस अँड प्रिंटिंग अँड एन्ग्रेव्हिंग वर्क्स’ हा छापखाना सुरू केला. मात्र पुरेसे भांडवल नसल्याने  शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्याशी भागीदारी करण्याची पाळी दादासाहेब फाळके यांच्यावर आली. त्यामुळे छापखान्याचे नाव ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस’ असे बदलण्याची पाळीही आली.
हा छापखाना लोणावळ्याहून दादर पूर्वेला शेठ मथरादास मानजी वालजी (या शेठजींचे नावही दादासाहेब फाळके यांच्या काही चरित्रकारांनी शेठ मथरादास मकनदास असे चुकीचे दिलेले आहे.) यांच्या ‘मथरा भुवन’मध्येच दादासाहेब फाळके यांनी हलवला होता. मात्र वर्षभराच्या आतच दादासाहेब फाळके यांचे आपल्या भागीदारांशी मतभेद झाले व त्यांनी ‘लक्ष्मी प्रिंटिंग वर्क्स’मधून अंग काढून घेतले. तरीही हा छापखाना पुढे काही महिने ‘मथरा भुवन’मध्येच होता.
भारतात चित्रपट आपल्याला तयार करता आला पाहिजे या ध्यासाने झपाटलेल्या दादासाहेब फाळके चित्रनिर्मितीचे सारे तंत्र शिकून घेण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी 1912 रोजी इंग्लंडला रवाना झाले. तेथे अतिशय परिश्रमपूर्वक सर्व माहिती गोळा करून तसेच चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-यासामग्रीच्या खरेदीची ऑर्डर नोंदवून ते 1 एप्रिल 1912 रोजी मुंबईत परत आले. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रणाच्या दृष्टीने स्टुडिओ उभारण्यासाठी सुयोग्य अशी प्रशस्त जागा शोधण्यास फाळके यांनी सुरुवात केली. नेमका याच सुमारास ‘लक्ष्मी प्रिंटिंग वर्क्स’ हा छापखाना ‘मथरा भुवना’तून भायखळ्याच्या साखळी स्ट्रीटवर हलवला गेला होता. त्यामुळे मथरादास मानजी वालजींचा ‘बंगला’ रिकामा झाला होता. दादासाहेबांना हा ‘बंगला’च आपल्या चित्रीकरणाच्या दृष्टीने सोयीचा वाटू लागला. त्याबरोबर त्यांनी मथरादास मानजी वालजींची ताबडतोब भेट घेतली.
नवा धंदा आपल्या जागेत सुरू होत आहे हे पाहून शेठजींनीही आनंदाने आपला ‘बंगला’ दादासाहेबांच्या हवाली केला. ‘मथरा भुवन’च्या याच वास्तूमध्ये वास्तव्य असताना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे बरेचसे इनडोअर चित्रीकरण झालेले आहे.
‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर दादासाहेब फाळके यांना मुंबई चित्रपट व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त वाटेनाशी झाली. याचे प्रमुख कारण मुंबईतील उष्ण हवा. तिचा फिल्मवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असे. या अडचणी लक्षात घेऊन चित्रपटनिर्मितीचे आपले बस्तान ‘मथरा भुवन’मधून फाळके यांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी नाशिकला हलवले. त्यानंतर त्यांचा ‘मथरा भुवन’ या वास्तूशी पुन्हा कधी संबंध आला नाही. ‘मथरा भुवन’मधील हा ‘बंगला’ कालांतराने मोडकळीस आला व अस्तंगत झाला. पण तो तसा होईपर्यंत ही वास्तू जतन करण्याचा विचार सरकार किंवा भारतीय चित्रपटसृष्टीतील धुरिणांना सुचू नये याचे आश्चर्य वाटत राहते. ‘मथरा भुवन’ जिथे आहे त्या रस्त्याला पूर्वी दादर मेन रोड असे नाव होते. 30 एप्रिल 1870 रोजी फाळके यांचा नाशिक   जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे जन्म झाला. 1970 मध्ये दादासाहेब फाळके यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र सरकारने साजरी केली. 1970 च्या सुमारास ‘दादर मेन रोड’चे नाव बदलून ते मुंबई महानगरपालिकेने ‘दादासाहेब फाळके मार्ग’ असे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब फाळके मार्ग जिथे मिळतात तिथे एक वाहतूक बेट तयार करण्यात आले असून त्या जागी दादासाहेब फाळके यांचा अर्धपुतळाही बसवण्यात आला आहे.
दादासाहेब फाळके यांनी ‘मथरा भुवन’ 1913 ला सोडले, पण त्यांनी दाखवलेल्या ‘मार्गावर’ चालत पुढे दादासाहेब फाळके मार्गावर (आधीचा दादर मेन रोड) द्वारकादास संपट यांचा कोहिनूर स्टुडिओ, रूपतारा स्टुडिओ, श्री साउंड सर्व्हिस, रणजित स्टुडिओ असे स्टुडिओ स्थापन झाले व तेथून उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. 1914-15च्या सुमारास आऊटडोअर शूटिंग करण्यासाठी अद्ययावत स्टुडिओ नव्हते. त्यामुळे जेथे चित्रीकरण चालत असे तिथे मनुष्यवस्ती कमी व नीरव शांतता असणे गरजेचे असायचे. एकेकाळी तसा परिसर असलेल्या दादर पूर्वला कालांतराने हळूहळू नागरी वस्ती वाढू लागली. त्यामुळे चित्रीकरणात बाधा येऊ लागली. त्यामुळे त्यातील कोहिनूर स्टुडिओ हा सर्वप्रथम दादर पूर्व परिसरातून हलला. त्यानंतर 1970 च्या दशकापर्यंत वैभवशाली दिवस पाहिलेल्या अन्य स्टुडिओंनी अन्य विविध कारणांनी मान टाकायला सुरुवात केली. दादासाहेब फाळके मार्गावरील एका छेदरस्त्याच्या चौकाला ‘अलबेला’फेम अभिनेते ‘मास्टर भगवान दादा पालव चौक ’असे नाव देण्यात आले आहे. कारण ते तेथील एका इमारतीत राहत होते. दादासाहेब फाळके मार्गावरील या सा-याखाणाखुणा आता ‘ऐतिहासिक’ म्हणूनच उरलेल्या आहेत.
भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ चा पहिला खेळ 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्याचे द्वार त्या दिवसापासून खुले झाले. या घटनेच्या शताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी अथक परिश्रमांती हे भव्यदिव्य यश साकार केले, त्याच मार्गाने पुढे जाऊन भारतीय कलावंत, दिग्दर्शक, संगीतकार व अन्य तंत्रज्ञांनी त्रिखंडात कीर्ती संपादन केली. दादासाहेब फाळके यांचा हा ‘पथदर्शी’ जीवनालेख न्याहाळत असताना स्वाभाविकपणे मुंबईच्या दादर (पूर्व) विभागातील दादासाहेब फाळके मार्ग व तेथील ‘मथरा भुवन’ (दादासाहेब फाळकेंच्या काही चरित्रग्रंथांमध्ये या वास्तूचे नाव ‘मथुरा’ भुवन असे दिले आहे. मात्र ते चुकीचे आहे. कारण ‘मथरा भुवन’ असे लिहिलेली संगमरवरी पाटीच तेथील नागरिकांनी अधिकृतपणे या वास्तूच्या बाहेर लावली आहे.) ही वास्तू मनात रुंजी घालू लागते. मंतरलेले दिवस पाहिलेला हा सारा परिसर आता चित्रनिर्मितीबाबत एकदम उदासवाणा होऊन गेला आहे.
दादरचा विजयनगर रेल्वेपूल ओलांडून पूर्वेला आले की उजव्या हाताला वळून सरळ सात मिनिटे चालत गेले की लागते तीच प्रसिद्ध ‘मथरा भुवन’ ही वास्तू. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचे बरेचसे इनडोअर शूटिंग याच वास्तूतील ‘बंगल्यात’ केलेले होते. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक वास्तू होती. ‘होती’ म्हणण्याचे कारण असे की हा ‘बंगला’ मोडकळीस येऊन 1977 मध्ये त्या वास्तूचा एक भाग कोसळला. त्यानंतर ‘म्हाडा’ने ही वास्तू ताब्यात घेतली व हा ‘बंगला’ तोडला. ‘मथरा भुवन’ या वास्तूतील लोखंडी गंजलेल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या व डाव्या हाताला एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या एकमजली दोन जुन्या चाळी लागतात. या चाळींचे आयुष्यमान तब्बल 120 वर्षांहून अधिक आहे. या चाळींच्या शेवटी आडव्या ओळीत एक हवेलीवजा दोन मजल्यांची चाळच होती. त्याचाच उल्लेख दादासाहेब फाळके, त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके, तसेच दादासाहेबांचे चरित्र लिहिणाºयांनी ‘बंगला’ असा केला आहे. उत्तम कॅमेरामन असलेल्या दादासाहेब फाळके यांनी 1905 मध्ये भारत सरकारच्या आर्किऑलॉजिकल खात्यातील ड्राफ्ट्समन फोटोग्राफर पदाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनाने मुद्रण व्यवसायामध्ये काही उत्तम कामगिरी करण्याचे मनावर घेतले. 1906 मध्ये थोडेफार जुजबी भांडवल जमवून त्यांनी लोणावळा येथे ‘फाळकेज आटर््स अँड प्रिंटिंग अँड एन्ग्रेव्हिंग वर्क्स’ हा छापखाना सुरू केला. मात्र पुरेसे भांडवल नसल्याने  शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्याशी भागीदारी करण्याची पाळी दादासाहेब फाळके यांच्यावर आली. त्यामुळे छापखान्याचे नाव ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस’ असे बदलण्याची पाळीही आली. हा छापखाना लोणावळ्याहून दादर पूर्वेला शेठ मथरादास मानजी वालजी (या शेठजींचे नावही दादासाहेब फाळके यांच्या काही चरित्रकारांनी शेठ मथरादास मकनदास असे चुकीचे दिलेले आहे.) यांच्या ‘मथरा भुवन’मध्येच दादासाहेब फाळके यांनी हलवला होता. मात्र वर्षभराच्या आतच दादासाहेब फाळके यांचे आपल्या भागीदारांशी मतभेद झाले व त्यांनी ‘लक्ष्मी प्रिंटिंग वर्क्स’मधून अंग काढून घेतले. तरीही हा छापखाना पुढे काही महिने ‘मथरा भुवन’मध्येच होता.
भारतात चित्रपट आपल्याला तयार करता आला पाहिजे या ध्यासाने झपाटलेल्या दादासाहेब फाळके चित्रनिर्मितीचे सारे तंत्र शिकून घेण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी 1912 रोजी इंग्लंडला रवाना झाले. तेथे अतिशय परिश्रमपूर्वक सर्व माहिती गोळा करून तसेच चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-यासामग्रीच्या खरेदीची ऑर्डर नोंदवून ते 1 एप्रिल 1912 रोजी मुंबईत परत आले. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रणाच्या दृष्टीने स्टुडिओ उभारण्यासाठी सुयोग्य अशी प्रशस्त जागा शोधण्यास फाळके यांनी सुरुवात केली. नेमका याच सुमारास ‘लक्ष्मी प्रिंटिंग वर्क्स’ हा छापखाना ‘मथरा भुवना’तून भायखळ्याच्या साखळी स्ट्रीटवर हलवला गेला होता. त्यामुळे मथरादास मानजी वालजींचा ‘बंगला’ रिकामा झाला होता. दादासाहेबांना हा ‘बंगला’च आपल्या चित्रीकरणाच्या दृष्टीने सोयीचा वाटू लागला. त्याबरोबर त्यांनी मथरादास मानजी वालजींची ताबडतोब भेट घेतली. नवा धंदा आपल्या जागेत सुरू होत आहे हे पाहून शेठजींनीही आनंदाने आपला ‘बंगला’ दादासाहेबांच्या हवाली केला. ‘मथरा भुवन’च्या याच वास्तूमध्ये वास्तव्य असताना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे बरेचसे इनडोअर चित्रीकरण झालेले आहे.
‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर दादासाहेब फाळके यांना मुंबई चित्रपट व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त वाटेनाशी झाली. याचे प्रमुख कारण मुंबईतील उष्ण हवा. तिचा फिल्मवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असे. या अडचणी लक्षात घेऊन चित्रपटनिर्मितीचे आपले बस्तान ‘मथरा भुवन’मधून फाळके यांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी नाशिकला हलवले. त्यानंतर त्यांचा ‘मथरा भुवन’ या वास्तूशी पुन्हा कधी संबंध आला नाही. ‘मथरा भुवन’मधील हा ‘बंगला’ कालांतराने मोडकळीस आला व अस्तंगत झाला. पण तो तसा होईपर्यंत ही वास्तू जतन करण्याचा विचार सरकार किंवा भारतीय चित्रपटसृष्टीतील धुरिणांना सुचू नये याचे आश्चर्य वाटत राहते. ‘मथरा भुवन’ जिथे आहे त्या रस्त्याला पूर्वी दादर मेन रोड असे नाव होते. 30 एप्रिल 1870 रोजी फाळके यांचा नाशिक   जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे जन्म झाला. 1970 मध्ये दादासाहेब फाळके यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र सरकारने साजरी केली. 1970 च्या सुमारास ‘दादर मेन रोड’चे नाव बदलून ते मुंबई महानगरपालिकेने ‘दादासाहेब फाळके मार्ग’ असे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब फाळके मार्ग जिथे मिळतात तिथे एक वाहतूक बेट तयार करण्यात आले असून त्या जागी दादासाहेब फाळके यांचा अर्धपुतळाही बसवण्यात आला आहे.
दादासाहेब फाळके यांनी ‘मथरा भुवन’ 1913 ला सोडले, पण त्यांनी दाखवलेल्या ‘मार्गावर’ चालत पुढे दादासाहेब फाळके मार्गावर (आधीचा दादर मेन रोड) द्वारकादास संपट यांचा कोहिनूर स्टुडिओ, रूपतारा स्टुडिओ, श्री साउंड सर्व्हिस, रणजित स्टुडिओ असे स्टुडिओ स्थापन झाले व तेथून उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. 1914-15च्या सुमारास आऊटडोअर शूटिंग करण्यासाठी अद्ययावत स्टुडिओ नव्हते. त्यामुळे जेथे चित्रीकरण चालत असे तिथे मनुष्यवस्ती कमी व नीरव शांतता असणे गरजेचे असायचे. एकेकाळी तसा परिसर असलेल्या दादर पूर्वला कालांतराने हळूहळू नागरी वस्ती वाढू लागली. त्यामुळे चित्रीकरणात बाधा येऊ लागली. त्यामुळे त्यातील कोहिनूर स्टुडिओ हा सर्वप्रथम दादर पूर्व परिसरातून हलला. त्यानंतर 1970 च्या दशकापर्यंत वैभवशाली दिवस पाहिलेल्या अन्य स्टुडिओंनी अन्य विविध कारणांनी मान टाकायला सुरुवात केली. दादासाहेब फाळके मार्गावरील एका छेदरस्त्याच्या चौकाला ‘अलबेला’फेम अभिनेते ‘मास्टर भगवान दादा पालव चौक ’असे नाव देण्यात आले आहे. कारण ते तेथील एका इमारतीत राहत होते. दादासाहेब फाळके मार्गावरील या सा-याखाणाखुणा आता ‘ऐतिहासिक’ म्हणूनच उरलेल्या आहेत.
-----------

No comments:

Post a Comment