बातमीचा मूळ भाग
भारत ही देखील माझी मातृभूमीच आहे. येथे माझी
सर्व जिव्हाळ्याची माणसे
राहातात. त्यांना भेटण्यासाठी व डाॅ.व्दारकानाथ कोटणीसांची स्मृती ज्या
देशाने जपलीय, त्या भारताच्या मातीला वंदन करण्यासाठी मी येथे आले आहे...हे
भावस्पर्शी उद्गार आहेत १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर जखमी
निर्वासितांच्या उपचारांसाठी भारतातून चीनमध्ये गेलेले डाॅ. व्दारकानाथ
कोटणीस यांच्या पत्नी क्यो चिंग लान यांचे. प्रदीर्घ काळानंतर क्यो चिंग
लान
या भारतभेटीसाठी मुंबईमध्ये १० जानेवारी १९९९ रोजी आल्या होत्या. त्यावेळी
त्यांची भेट मी घेतली होती. त्यावेळी मी त्यांच्याशी केलेल्या बातचितीवर
आधारित बातमी दै. सामनाच्या ११ जानेवारी १९९९च्या अंकात प्रसिद्ध झाली
होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.
डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांची स्मृतीच माझ्या आयुष्याचा आधार - क्यो चिंग लान
डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांची स्मृतीच माझ्या आयुष्याचा आधार - क्यो चिंग लान
- समीर परांजपे
भारत
ही देखील माझी मातृभूमीच आहे. येथे माझी सर्व जिव्हाळ्याची माणसे राहातात.
त्यांना भेटण्यासाठी व डाॅ. व्दारकानाथ कोटणीसांची स्मृती ज्या देशाने
जपलीय, त्या भारताच्या मातीला वंदन करण्यासाठी मी येथे आले आहे...हे
भावस्पर्शी उद्गार आहेत १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर जखमी
निर्वासितांच्या उपचारांसाठी भारतातून चीनमध्ये गेलेले डाॅ. व्दारकानाथ
कोटणीस यांच्या पत्नी क्यो चिंग लान यांचे. त्या आज प्रदीर्घ काळानंतर
भारतामध्ये आल्या आहेत.
मुंबईतील सहार विमानतळावर क्यो चिंग लान यांनी दै. `सामना'शी बोलताना
आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या डाॅ. कोटणीस यांची निरंतर
आठवण हीच माझ्या आयुष्याचा आधार आहे. क्यो चिंग लान यांचे वय ८२ वर्षांचे
आहे. प्रकृती अतिशय ठणठणीत. स्वागतासाठी आलेल्या सर्वांचे त्यांनी
मनमोकळ्या हास्याने कौतुक केले.डाॅ. कोटणीसांच्या पत्नी क्यो चिंग लान या आगामी तीन आठवड्यांपर्यंत मुंबईत असणार आहेत. त्यांचे स्वागत करायला आज विमानतळावर डाॅ. कोटणीसांच्या भगिनी डाॅ. वत्सला कोटणीस, मनोरमा कोटणीस, त्यांचे भाऊ विठ्ठल कोटणीस आदी कुटुंबीय उपस्थित होते. क्यो चिंग लान यांना पाहून साक्षात डाॅ. द्वारकानाथ कोटणीसांची प्रतिमाच आपल्यासमोर जिवंत झाली, असे डाॅ. वत्सला कोटणीस यांनी सांगितले. क्यो चिंग लान या आपल्या नव्हाळीच्या लोकांना भेटण्यासाठी मुंबईत आल्या असून त्यांचे अन्य कोणतेही कार्यक्रम नाहीत.
No comments:
Post a Comment