Monday, November 27, 2017

हंपी - ऐतिहासिक हंपीच्या पार्श्वभूमीवर फुललेली अलवार प्रेमकथा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी 17 नोव्हेंबर 2017

https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-marathi-movie-hampi-movie-review-5748224-PHO.html?ref=rlreco

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटसाठी हंपी या चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व वेबलिंक सोबत दिली आहे.
---
हंपी - ऐतिहासिक हंपीच्या पार्श्वभूमीवर फुललेली अलवार प्रेमकथा
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव
कथा- पटकथा-संवाद : अदिती मोघे
दिग्दर्शन - प्रकाश कुंटे
संगीत - नरेंद्र भिडे, आदित्य बेडेकर
निर्माता - योगेश भालेराव
चित्रपट प्रकार : फॅमिली ड्रामा
--
कथा - हंपी हे कर्नाटकातील एक महत्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ अाहे. हंपी ही विजयनगर साम्राज्याची १४ व्या शतकात राजधानी होती. तुंगभद्रा नदीच्या तीरावर वसलेल्या हंपी नगरीमध्ये असंख्य मंदिरे प्राचीन काळात उभारलेली अाहेत. त्या मंदिरांमधून भारतीय संस्कृतीचे अोजस्वी दर्शन होते. मध्ययुगीन काळात पोर्तुगीज, पर्शियन, युरोपियन प्रवाशांनी हंपी येथे जाऊन तेथील भव्य मंदिरे, वास्तूंचे अत्यंत रोचक वर्णन अापल्या प्रवासवर्णनांमध्ये केलेले अाहे. मुस्लिम अाक्रमकांनी विजयनगर साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर हंपी येथील असंख्य मंदिरांचा विध्वंस केला. त्यामुळे हंपी येथे अनेक मंदिरांचे भग्नावशेष अाजही पाहायला मिळतात. अशा या ऐतिहासिक ठिकाणाला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून हा िचत्रपट अापली वाटचाल करतो. इशा ही मुलगी हंपीला एकटीच अालेली अाहे. ती खरतर अापली मैत्रिण गिरिजा हिच्याबरोबर येणार होती. परंतु गिरिजा अायत्यावेळी न अाल्याने इशा एकटीच हंपीला अालेली अाहे. इशाही मनातून काहीशी निराश अाहे. याचे कारण तिच्या अाईवडिलांनी तब्बल २८ वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला अाहे. या घटनेने इशाच्या मनावर अोरखडा उमटला अाहे. ती हे शल्य विसरण्यासाठी हंपी येथे अाली अाहे. तिथे भटकंती करत असताना इशाला तिच्या हॉटेलवर कबीर नावाचा मुलगा दिसतो. हा मुलगा आर्किटेक्ट आहे. त्याला रुटिन आयुष्य जगायचे नाहीये. त्यामुळे तोही हंपी येथे भटकंतीसाठी आला आहे. त्याला तेथे येऊन बरेच दिवस झाले आहेत. पण त्याचा हंपीतून पाय निघत नसल्यामुळे त्याचा मुक्काम बरेच दिवस लांबला आहे. तो अतिशय मनमोकळा आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण तो आनंदात घालविण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत असलेल्या लोकांनाही तो आनंद देण्याचा प्रयत्न करतो. इशा त्याला भेटल्यानंतर तो तिच्याशी उत्तम मित्राप्रमाणे संवाद साधतो. पण इशाला तिच्या आईवडिलांच्या विभक्त होण्याचा त्रास होत असतो. जे वाईट अनुभव आलेले असतात त्यामुळे तिचा उत्तम मैत्री, प्रेम या गोष्टींवरुन विश्वास उडालेला असतो. मात्र ती जसजशी कबीर सान्निध्यात येते तसतसे तिच्या मनात त्याच्या विश्वास हळुहळू एक आत्मीयता निर्माण होते. कबीर आपल्या वागण्यातून तिला हा विश्वास देतो की जगात प्रेम असते, मैत्रीचे बंध असतात. पण तरीही गतकाळातल्या आठवणी आल्या की इशा ही आपल्या कोशात जात असते. हंपीतील विविध मंदिरांना ती कबीर सोबत भेटी देते. हळुहळु ती कबीरकडे आकर्षित होते. त्याच्या प्रेमात पडते. मात्र ते प्रेम ती तिच्या स्वभावातील कोंडीमुळे नीटपणे प्रकट करु शकत नसते. ती हंपीत असताना एक दिवस अचानक तिची मैत्रिण गिरीजा तिथे येते. मग गिरीजा, कबीर व इशा यांची गट्टी जमून ते हंपीमध्ये भ्रमंतीला सुरुवात करतात. हंपीतील एकेका मंदिर व ऐतिहासिक ठिकाणी फिरताना या तिघांमधील संवादातून कथा पुढे सरकत जाते. एकदा असेच गप्पा मारत असताना इशा पुन्हा आपल्या कोशात जाते. या जगात प्रेम ही गोष्ट अस्तित्वात नाही, मला कोणाचीही सोबत नको, मी एकटीच जगणार असे ती त्राग्याने कबीरला सांगते. कबीर तिला समजावायचा प्रयत्न करतो की तुझी मते अयोग्य आहेत म्हणून. पण इशा काही ऐकत नाही. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी इशा हंपीत ज्या हॉटेलमध्ये राहिलेली असते त्याच हॉटेलमध्ये कबीर राहात असलेल्या रुमवर सकाळी त्याला बोलवायला जाते. पण तिथे गेल्यावर इशाला कळते की, कबीर हॉटेल सोडून व कोणालाही न सांगता निघून गेलेला आहे. इशाला धक्का बसतो. तिला आता हे पुरते ठाऊक असते की ती कबीरच्या प्रेमात पडलेली आहे. तो असा निघून गेल्याने तिला ते सहन झालेले नाही. ती आपली मैत्रिण गिरीजाच्या मदतीने कबीरला शोधायचा प्रयत्न करते पण तो काही हंपीमध्ये कुठेही सापडत नाही. काही दिवसांनी गिरीजादेखील हंपीतून दिल्लीला तिच्या घरी निघून जाते. आता हंपीमध्ये इशा एकटीच उरते. तिला कबीरने जे जे सांगितले ते अशा क्षणी आठवू लागते. तिला खऱ्या प्रेमाचा अर्थ या दिवसांत उमगतो. ती आजूबाजूच्या माणसांत, निसर्गात, वास्तूत खूप रमायला लागते. हंपीच्या वातावरणात रमून जाते. पण त्याचबरोबर कबीरचा शोधही सुरु ठेवते. तिला कबीर सापडतो का, ती कबीरसमोर अापले प्रेम व्यक्त करु शकते का, या कथानकाचा शेवट सुखद होतो की अजून काही वेगळाच असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांचा उलगडा होण्यासाठी हंपी हा चित्रपट पाहायलाच हवा.
अभिनय - इशाची भूमिका करणार्या सोनाली कुलकर्णी हिने तिच्या हेअरस्टाइलपासून वेशभूषेपर्यंत वेगळाच लूक या चित्रपटात घेतला अाहे. अापल्याच कोशात वावरणारी, जगापासून तुटू पाहाणारी अशी इशा ही उच्चविद्याविभूषित तसेच उत्तम नृत्यांगनाही अाहे. पण तिने हे अापले सारे कलागुण निराशेच्या कोशात दडवून ठेवले अाहेत. ती अायुष्यातील क्षणांचा उत्तम अानंद घ्यायला विसरली अाहे. प्रेमावरचा तिचा विश्वास उडालेला अाहे. या सार्या भावनिक छटा सोनाली कुलकर्णी हिने उत्तम प्रकारे िचत्रपटात साकारल्या अाहेत. ती दिसलीही सुंदर अाहे. ललित प्रभाकर हा अाजच्या मराठी नायकांमध्ये अतिशय देखणा व अभिनयात वाकबगार असलेला अभिनेता अाहे. त्याने साकारलेली भ्रमंतीबाज तसेच समंजस कबीरची भूमिका हटके अाहे. त्याने संपूर्ण दाढीधारी जो लुक या िचत्रपटासाठी ठेवला अाहे, तो त्याच्या अाधीच्या िचत्रपटांत कधीही दिसला नव्हता. कबीर हा मनमौजी वाटत असला तरी तो िततकाच समंजस अाहे. हे सार्या व्यक्तिछटा ललित प्रभाकरने उत्तम वठविल्या अाहेत. प्राजक्ता माळी ही गिरीजाच्या भूमिकेत अाहे. ती एका मासिकामध्ये लेख लिहिते. तिने इशाच्या जिगरी मैत्रिणीची भूमिका चांगली केली अाहे. अार रणजीत या रिक्षाचालकाच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव अाहे. प्रियदर्शन वगळता इशा, कबीर, गिरीजा या तिन्ही पात्रांना िचत्रपटात अत्यंत अाधुनिक लूक अाहे. तो त्यांना शोभूनही दिसतो. त्यांच्या तोंडी जे संवाद अाहेत ते अदिती मोघे हिने लिहिले असून तिनेच या चित्रपटाची पटकथा, संवाद लिहिले अाहेत. अदिती मोघे ही दूरचित्रवाहिन्यांवर ट्रॅव्हल शोज लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भ्रमंती करत करत फुलत जाणारी कथा लिहून त्यावर चित्रपटासाठी पटकथा लिहिणे तिला सहजसोपे होते. हंपीसाठी ऐतिहासिक जागा निवडून तिथे एक फुलत जाणारी वेगळी प्रेमकथा तिने लिहिली. त्या प्रेमकथेला हंपी िचत्रपटातील कलाकारांनी चांगल्या अभिनयाने उत्तम फुलविले आहे.
दिग्दर्शन - हंपी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे हा नेहमी वेगळे प्रयोग करताना दिसतो. हंपी िचत्रपटातील इशा व कबीरमधील प्रेमकथा रंगविताना त्याने हंपीतील वास्तूंचा जो कॅनव्हास वापरला आहे तो अतिशय मनोवेधक आहे. अख्ख्या कथेत हंपी हाच केंद्रबिंदू आहे हे त्याने पडद्यावर उत्तम प्रकारे ठसविले आहे. त्याचे दिग्दर्शन कंठाळी होत नाही. त्याने संयत शैलीत हा िचत्रपट बनविला आहे. कुठेही अवास्तव काहीही दाखविलेले नाही. मुंबई-पुणे-मुंबईसारख्या िचत्रपटात एखाद्या शहरात वा जागी भटकताना दोन जीवांमध्ये फुललेले प्रेम सतीश राजवाडेने उत्तम प्रकारे दाखविले होते. त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाचा सिक्वेल निघाला व आता तर या िचत्रपटाचा तिसरा भाग येतो आहे. हंपीची कथा अशीच त्या शहरातील भ्रमंतीतून फुलत जाते. अर्थात मुंबई-पुणे-मंुंबईच्या कथेचा कॅनव्हास निराळा आहे. पण हंपी चित्रपटात दिग्दर्शनाच्या अंगाने अधिक मॅच्युरिटी आहे. अशा प्रकारे ट्रॅव्हलबेस्ड् चित्रपट क्वचितच मराठीत निघतात. त्यांना प्रेक्षकांना उचलून धरले पाहिजे. 
संगीत - हंपी चित्रपटातील गीते वैभव जोशी, ओंकार कुलकर्णीने लिहिलेली आहेत. अपनेही रंगमे हे गाणे राहूल देशपांडे तर , मरुगेलरा ओ राघवा हे गाणे रुपाली मोघे हिने गायले आहे. या िचत्रपटाला नरेंद्र भिडे, आिदत्य बेडेकर यांनी संगीत दिले असून पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. मरुगेलरा ओ राघवा हे कन्नड भाषेतील गाणे आहे. ते छान जमले आहे. संगीत, छायािचत्रण, दिग्दर्शन, वेशभूषा या साऱ्याच अंगाने हंपी चित्रपट चांगलाच जमून आला आहे.

No comments:

Post a Comment