Sunday, June 25, 2017

ऑडिओ, टेक्स्ट एकातच असलेल्या नव्या अभिनव मोबाइल अॅपमुळे होणार मराठीसह अनेक भाषांतील पुस्तकांचे वाचन, श्रवण अधिक सुलभ - बुकहंगामा पोर्टलवर मिळणार ही सुविधा या जूनअखेरीस - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. २५ जून २०१७.


दै. दिव्य मराठीच्या २५ जून २०१७च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्याची वेबलिंक, टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aura…/…/25062017/0/10/
---
ऑडिओ, टेक्स्ट एकातच असलेल्या नव्या अभिनव मोबाइल अॅपमुळे 
होणार मराठीसह अनेक भाषांतील पुस्तकांचे वाचन, श्रवण अधिक सुलभ
--
बुकहंगामा पोर्टलवर मिळणार ही सुविधा या जूनअखेरीस
--
- समीर परांजपे
मुंबई, दि. २५ जून 
मराठीसह अन्य तीन भाषांतील इ-बुक मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या बुकहंगामा पोर्टलवर या जून महिन्याच्या अखेरीस एक अभिनव मोबाईल अॅप उपलब्ध होणार अाहे. त्यात ऑडीओ (ध्वनी) आणि टेक्स्ट (वाचन) हे एकाच अॅपमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे वेगवेगळी अॅप मोबाईल मध्ये ठेवावी लागणार नाहीत. त्यामुळे ऑडिओ स्वरुपात पुस्तक ऐकताना नेट वाय-फाय किंवा डाटा कार्डची गरज भासणार नाही. त्यामुळे खर्चात बचत होईल. अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण अॅप सध्या भारतातील पुस्तकविषयक एकाही वेबसाइटवर उपलब्ध नाही.
यासंदर्भात बुकहंगामाच्या संचालकांपैकी एक असलेले विक्रम भागवत यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मोबाइल अॅपने मराठीसह अन्य भाषांतील वाचकांची मोठी सोय होईल. तसेच मराठी ऑडिओ पुस्तकांच्या श्रवणात त्यामुळे एक नवा बदलही येईल. 
पाच वर्षांपूर्वी साहित्यिक नाटककार विक्रम भागवत यांनी ‘न लिहिलेली पत्रे’ हे फेसबुक पेज सुरु केले आणि अल्पावधीत त्याची लोकप्रियता वाढत गेली. अनेक अभिनव विषय हाताळणाऱ्या पत्रमालिका या पेज वरून प्रकाशित करण्यात आल्या. यामध्ये मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध, चित्रपट समीक्षा रसग्रहण, आयुर्वेदिक वृक्ष, असे साहित्यिक, सामाजिक भान जोपासणारे मानवी भावभावनांचे चित्रण करणारे अनेक विषय आदींचा समावेश आहे. आजवर एकूण पाच हजाराहून अधिक पत्र या पेजवरून प्रकाशित करण्यात आली आहेत. यातून पुढे जाऊन या नव्या दमाच्या लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करायचे अशी कल्पना पुढे आली आणि त्यातून इ-बुक्सची निर्मिती करण्यासाठी विक्रम भागवत, सुनील गोवर्धन, जयंत पोंक्षे या तिघांनी मिळून www.bookhungama.com या पोर्टलची निर्मिती केली. बुकहंगामातर्फे अलिकडेच पुण्यात पहिले नुक्कड साहित्य संमेलनही घेण्यात आले होते.
बुकहंगामा या पोर्टलवर राजेंद्र बनहट्टी, डॉ. माधवी वैद्य, भा. रा. भागवत, गंगाधर गाडगीळ, सुधीर गाडगीळ, चिन्मय मांडलेकर अशा मातब्बर लेखकांची पुस्तके जशी इ-बुक्स बुकहंगामा या पोर्टलवर आहेत तशीच तरुण, होतकरू आणि ज्यांना प्रकाशन व्यासपीठ चटकन उपलब्ब्ध होत नाही पण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा लेखकांची इ-पुस्तके या पोर्टलवर उपलब्ध आहेत. गेल्या दिड वर्षात बुकहंगामावर ७५० इ-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली पुस्तके त्यात असून त्यातील सुमारे दीडशे पुस्तके ही बुकहंगामाने प्रसिद्ध केलेली स्वत:ची इ-पुस्तके आहेत. बुकहंगामाने प्रसिद्ध केलेल्यापैकी प्रा. माधवी भट यांनी लिहिलेले बारकीची पत्रे, रुपाली पारखे-देशिंगकर यांचे फिटे अंधाराचे जाळे अशी काही इ-पुस्तके विशेष गाजली आहेत. त्याशिवाय बुकहंगामाने नवी इ-बुक करण्यासाठी ७५० पुस्तकांचे हक्क मिळविले आहेत. बुकहंगामाची स्वतःची जागतिक दर्जाची इ-बुक निर्मिती यंत्रणा आहे. ते सध्या प्रत्येक महिन्याला ६० इ-बुकची निर्मिती करतात. आता त्यातील निवडक पुस्तकांची ऑडिओ बुक तयार होतील व ती नवीन अॅपद्वारे श्रोत्यांना ऐकता येतील.
मराठी लेखकांसाठी खास कार्यशाळा
बुकहंगामातर्फे मराठी लेखकांसाठी दोन दिवसांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. त्यात लेखन मार्गदर्शन आणि आपले पुस्तक विकण्यासाठी सोशल मिडियाचा वापर कसा करावा आपले ब्रँडिंग कसे करावे ह्याचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातून येणाऱ्या होतकरू लेखकांनाही अधिक प्रोत्साहन मिळावे याकडे बुकहंगामाचा कटाक्ष असतो.

मी माझी रेषा मोठी केली...- ना. धों. महानोर - मुलाखत - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. २५ जून २०१७.


दै. दिव्य मराठीच्या दि. २५ जून २०१७च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये निसर्गकवी ना. धों. महानोर यांची व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांची मी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ना. धों. महानोर यांच्याशी बोलताना त्यांनी मुलाखतीच्या विषयाबरोबरच त्यांच्या कविता, शेती अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तो साराच अनुभव अविस्मरणीय होता. श्रीपाद जोशी यांच्याशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा गेल्या दोन शतकांचा पट उलग़डून दाखविला. या विचारशील माणसांबरोबर घालविले क्षण दीर्घकाळ स्मरणात राहातील. ना. धों. महानोर व डॉ. श्रीपाद जोशी यांच्या मुलाखती सविस्तरपणे पुढे दिल्या आहेत. त्या मुलाखतीची वेबपेज लिंक, टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिले आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/25062017/0/2/
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-n-5630373-PHO.html
---
मी माझी रेषा मोठी केली...- ना. धों. महानोर
---
शब्दांकन - समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त बारा जागांवर साहित्य, कला, विज्ञान, सहकार, संस्कृती या पाच क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती होणे हे घटनेतील तरतुदींनूसार आवश्यक होते. परंतू महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर याबाबत इतकी चालढकल झालेली आहे की, या बारा म्हणजे आपल्या मर्जीतील नेत्यांची खोगीरभरती करण्याची ठिकाणे असा समज राजकीय पक्षांनी करुन घेतला व त्याप्रमाणे कृती केली. हा सरळसरळ घटनाभंग आहे. या खोगीरभरतीचा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवून त्याच्या आधारे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने अडीच वर्षांपूर्वी नागपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून राज्यपालनियुक्त या बारा जागांवर घटनेतील तरतुदींप्रमाणे नियुक्त्या न केल्याने मोठा अनुशेष निर्माण झाला. या विषयाकडे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे. याआधी डोंबिवलीच्या साहित्य संमेलनातही साहित्य, कला, विज्ञान, सहकार, संस्कृती क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या विधापरिषदेवर व्हाव्यात विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त जागांवर नियुक्त झालेल्या साहित्यिकांपैकी ग. दि. माडगुळकर, ना. धो. महानोर, लक्ष्मण माने यांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेऊन कला, साहित्याबरोबरच अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. साहित्यिक नेहमी बोटचेपी भूमिका घेतात या आक्षेपालाही त्यांनी छेद दिला होता. ही उदाहरणे समोर असून देखील कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यांनी या बारा जागांबाबत बारा भानगडी करुन ठेवल्या व लोकशाही संकेतांचे मातेरे केले. हा सारा प्रश्न धसास लावण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे आधारस्तंभ व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी व कवितेबरोबरच समाजकारणात समरसतेने सक्रिय असलेले साहित्यिक ना. धो. महानोर यांच्या घेतलेल्या या मुलाखती.
---
माझी रेषा मीच मोठी केली! - ना. धो. महानोर
प्रश्न - विधानपरिषदेवर तुमची नेमणूक झाली, त्यावेळचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण कसे होते? नियुक्तीच्या संदर्भातले आठवणीत राहिलेले ठळक प्रसंग वा घटना?
ना. धो. महानोर - विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त ज्या बारा जागा असतात तिथे माझी पहिल्यांदा १९७८ साली निवड झाली. त्यावर्षी मराठवाड्यातील महाविद्यालयांचा वार्षिक महोत्सव परळी वैजनाथला होता. तिथे मला साहित्यिक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वार्षिक उत्सवाच्या समारोपप्रसंगी अचानक दहा बारा स्थानिक नेते व्यासपीठावर आले व त्यांनी माझ्या गळ्यात पुष्पहार घातला व मी आमदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. मी बुचकळ्यात पडलो. आमदार व्हायचे तर निवडणुक लढवावी लागते इतकेच मला माहित होते. निवडणुका लढविणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे काम आहे हे मला माहित होते. मग मी आमदार कसा झालो? हा मला पडलेला प्रश्न होता. त्यावर त्या लोकांनी राज्यपालनियुक्त बारा जागांमध्ये तुमची निवड झाली आहे असे सांगून ती प्रक्रिया समजावून सांगितले तेव्हा कुठे मला ते लक्षात आले. माझे नाव माझे सन्मित्र व त्यावेळी राज्यात पुलोद सरकारचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांनीच सुचविले होते अशी माहिती मला नंतर कळली. पवारांनी नुसते नाव सुचवून उपयोगाचे नव्हते तर त्यावेळी पुलोदच्या पाठीशी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, भाई वैद्य अशा अनेक व्रतस्थ माणसांचे भक्कम पाठबळ होते. या दिग्गजांनीही माझ्या नावाचा होकार दिला. अशा रितीने मी निवडणुका वगैरे न लढता आमदार झालो. पण विधानपरिषदेत जाऊन नेमके करायचे काय? याची काहीही माहिती नव्हती. त्यासाठी मग नागपूर अधिवेशनात जाऊन सभागृहाचे कामकाज कसे चालते वगैरे समजून घेतले. मी कविता करीत असलो तरी मुळात मी हाडाचा शेतकरी आहे. शेती, पाण्याचे प्रश्न महाराष्ट्रात तेव्हा अधिक बिकट होते. हे प्रश्न सभागृहात धसास लावण्याबरोबरच कला, संस्कृती, साहित्य यातील प्रश्नांची चर्चा सभागृहात घडवून आणायची हे मी मनोमन ठरविले होते. पुढील पाच वर्षे मी त्याच दिशेने काम केले. माझ्या आधी किंवा माझ्या वेळी साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रातील लोकांकडे राजकीय पक्षांतील लोक अत्यंत आदराने पाहात होते. या क्षेत्रातील मंडळींचे सहकार्य घेऊन महाराष्ट्रात काही चांगले घडवावे असा ध्यास यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील अशा साऱ्या मुख्यमंत्र्यांना लागलेला होता. त्यामुळे राज्यपालनियुक्त जागांवर आपल्या मर्जीतील राजकीय नेत्यांची खोगीरभरती करण्याचे साहस राजकीय पक्षांना होत नव्हते.
प्रश्न - एक कवी-लेखक-गीतकार आणि शेतकरी अशी कितीतरी भूमिकांतून तुम्ही विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले. या काळातल्या तुमच्या कामगिरीकडे तुम्ही कसे पाहता? तुम्ही त्या काळात शेती वा इतर प्रश्नांची कशी मांडणी केली? त्याला सरकारांनी कसा प्रतिसाद दिला?
ना. धो. महानोर - महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर साहित्यिक, कलावंतांचा प्रतिनिधी म्हणून दोन वेळा माझी नियुक्ती झाली. त्यामुळे राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून मी एकूण बारा वर्षे काम केले. शेतीचे व पाण्याचे प्रश्न अग्रक्रमाने मांडण्याबरोबरच कला, साहित्य, संस्कृतीच्या प्रश्नांचाही पाठपुरावा केला. महाराष्ट्राची शेती ही पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. कधी दहा वर्षांतली तीन वर्षे, तर कधी पाच वर्षे दुष्काळाची असतात. एखादे वर्षच चांगले असते. २१ जुलै १९८० साली मी बियाणे व खतांच्या कमतरतेबाबत विधानपरिषदेत आवाज उठविला होता. तेव्हा चौदाशे रुपये प्रति क्विंटल मिळणारे खत दोन हजार रुपये क्विंटलवर गेल्याने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले होते. बियाणांची कमतरता होती. त्यामुळे बडे-छोटे सगळेच शेतकरी टेकीला आलेले होते. ९ सप्टेंबर १९८२ रोजी विधानपरिषदेत मी अवर्षणामुळे महाराष्ट्रात उद््भवलेल्या टंचाईग्रस्त परिस्थितीचे वास्तव मांडले. शेतीशी संबंधित बहुतेक सर्व मुद्द्यांवर मी सभागृहात बोलत असे. जलसंघारणाबाबत आपल्याकडे अनास्था होती. त्यासाठी जलसंधारणाचे स्वतंत्र खाते हवे अशी आग्रही मागणी मी केली होती. त्यानूसार महाराष्ट्र सरकारने तसे वेगळे खाते निर्माण केले. १९ जुलै १९८४ रोजी मी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेबाबत जे प्रदीर्घ भाषण केले, त्याची फार गांभीर्याने दखल वसंतदादा पाटील यांनी घेतलेली होती. त्याशिवाय फलोद्यानाबाबत काही मुद्दे पोटतिडकीने मांडले होते. त्यातले गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवारांनी हालचाली केल्या. त्याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्रात फलोत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले व या बाबतीत आज महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. दुष्काळ, शेतीमाल व बाजारभाव, जलसंधारण या विषयांच्या मांडणीबरोबरच राज्यात कला अकादमी स्थापावी असा आग्रह मी धरला. मला सांगायला आनंद होतो की, पु. ल. देशपांडे कला अकादमी स्थापण्याचा निर्णय त्यानंतरच झाला. मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीचे प्रश्नही धसास लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच व्ही. शांताराम अध्यक्ष असलेली एक सांस्कृतिक समिती महाराष्ट्र सरकारने स्थापन केली. या क्षेत्राच्या गरजा ओळखून त्याला कशी मदत करता येईल हेही समिती ठरवत असे. त्यातूनच पुढे मराठी चित्रपटांना १५ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे ४० लाख रुपये अनुदान मिळते. साहित्यक्षेत्रात काही नवे घडावे या प्रेरणेने काही चर्चा विधानपरिषदेत उपस्थित केल्या. विश्वकोश मंडळातील संपादक मंड‌ळाचा गैरकारभार मी सभागृाहत मांडला. त्याचबरोबर साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशन योजना, साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखकांसाठी शिबिर, ग्रंथ प्रकाशन व विक्रीबाबतच्या समस्या, स्वस्त पुस्तक योजना, नियतकालिकांपुढील आर्थिक संकट, ग्रंथालय सेवकांचे तुटपुंजे प्रकार असे नाना प्रश्न मांडले. त्यातून नवलेखकांच्या प्रकाशकांना सरकारने अनुदान सुरु केले व इतरही बरेच चांगले निर्णय सरकारने घेतले. सगळे इथे विस्ताराने सांगणे शक्य नाही. कोणतेही क्षेत्र वर्ज्य न मानता मी प्रश्न मांडत राहिलो व काही वेळेस सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतले. कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित न राहाता माझी रेषा मी मोठी केली. विधानपरिषदेत मी उपस्थित केलेले प्रश्न व त्यावेळी केलेली भाषणे यांचे संकलन करुन माझे `विधिमंडळातून...' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
प्रश्न - राज्यपालाने नियुक्त केलेल्या आमदारास पक्षांचे, समाजघटकांचे दबाव झुगारून काम करता येते का? तुमचा अनुभव कसा होता?
ना. धो. महानोर - राज्यपालाने नियुक्त केलेल्या आमदारास पक्षांचे, समाजघटकांचे दबाव झुगारुन काम करता येते असा माझा अनुभव आहे. माझे सर्वच पक्षांमध्ये मित्र आहेत. मी शेतकरी आहे. कवी आहे. ती माझी पहिली बांधिलकी. त्यामुळे कोणतेही प्रश्न मांडताना कोण दुखावेल की सुखावेल याचा मी विचार केला नाही. शरद पवार यांच्याशी माझे अत्यंत जवळकीचे संबंध. पण सरकारी धोरणांवर टीका करण्याची वेळ आली तेव्हा मी कुणाचीही तमा बाळगली नाही. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदाराला कोणाच्याही दबावाला बळी न पडता नीट काम करता येते हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो.
प्रश्न - राज्यसभेतला लता मंगेशकरांपासून, रेखा, सचिन तेंडुलकरांपर्यंतच्या मंडळींचा अनुभव लक्षात घेता, विधानपरिषदेतही जागांचा अपव्यय होणार नाही, याची खात्री काय?
ना. धो. महानोर - राज्यसभा किंवा विधानपरिषदेत चित्रपट, संगीत, क्रिकेट आदी क्षेत्रातील लोकांना खासदार किंवा आमदार म्हणून नियुक्त केले जाते ते त्यांच्या वलयाकडे पाहून. ज्यांनी आमदारकी किंवा खासदारकी स्वीकारली आहे त्यांनी आपले संसदीय कर्तव्य पार पाडले पाहिजे या मताचा मी आहे. काही जण सभागृहामध्ये एकही विषय उपस्थित करत नाहीत, सभागृहात नेहमी गैरहजर राहातात, आमदार किंवा खासदार म्हणून जो निधी त्यांना मंजूर झालेला असतो तो लोककल्याणाच्या कामांसाठी नीट व पूर्णपणे खर्च करण्याचे भानही त्यांना नसते. मला वाटते ज्यांना राज्यपालनियुक्त आमदार किंवा राष्ट्रपतीनियुक्त खासदार बनायचे नसेल त्यांनी तसे स्पष्टपणे संबंधितांना सांगितले पाहिजे. आणि एकदा ती जबाबदारी स्वीकारली तर ती निभावली पाहिजे. त्या आमदार, खासदाराने त्याच्या क्षेत्रापुरते न बोलता आपली रेषा मोठी केली पाहिजे. इतर क्षेत्रातील विषयांबाबत माहिती घेऊन त्याने त्यावरही सभागृहांत चर्चा उपस्थित केली पाहिजे. आज समाजात साहित्य, कला, विज्ञान, सहकार, संस्कृती या क्षेत्रांतील अनेक अशा मान्यवर व्यक्ति आहेत की ज्यांना समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांचे पुरेसे भान आहे. अशा व्यक्तिंची नियुक्ती राज्यपालांनी केली पाहिजे. या नेमणुका राजकीय हस्तक्षेपाविना होऊ शकतात.यासाठी राज्यपालांनीही खमकी भूमिका घ्यायला हवी. माझ्यावर घटनेतील तरतुदींचे पालन करण्याची जबाबदारी आहे. त्यानूसारच या नियुक्त्या व्हायला हव्यात हे त्यांनी सत्ताधाऱ्यांना सांगितले पाहिजे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी त्या राज्यातील साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची नावे राज्यपालनियुक्त नेमणुकांच्या प्रस्तावात नसल्याने तो ठराव मुख्यमंत्र्यांना परत पाठवला होता. अशीच कणखर भूमिका प्रत्येक राज्यपालाने घ्यायला हवी.
------------------------------------------------------------------
डॉ. श्रीपाद जोशी मुलाखत
----
समाजाशी देणेघेणे नसलेल्यांचा नियुक्तीसाठी विचार करु नये..
--
विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त जागांवर जी खोगीरभरती सुरु आहे त्याबाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. व आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही या मुद्द्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. राज्य सरकार या प्रकरणाचा गंभीरपणे विचार करेल असे तुम्हाला वाटते का?
डॉ. श्रीपाद जोशी - राज्यपालनियुक्त जागांवर जी खोगीरभरती होते त्याविरोधात आवाज उठविण्याचे आमचे प्रयत्न सातत्याने सुुरुच आहेत. डोंबिवली येथे झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने संमत केलेल्या ठरावांपैकी ठराव क्र. १० हा सुमारे तीन वर्षांपूर्वी, पूर्वीच्या सरकारने विधानपरिषदेतील मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावरुन राज्यपालांनी केलेल्या १२ जागांवरील घटनाबाह्य नियुक्तीसंबंधातील होता. याच बाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने दाखल केलेली जनहित याचिका सुमारे अडीच वर्षांपासून शासनाच्या यथायोग्य प्रतिसादाअभावी अद्याप दाखल होण्याच्या पूर्वावस्थेत पडून आहे. तारखा मागून तारखांवर नागपूर-मुंबई असे हेलपाटे ज्येष्ठ नागरिक असलेले यािचकाकर्ते व त्यांचे वकील यांना पडत आहेत. शिवाय त्यासाठीचा आर्थिक बोजा वेगळाच. या घटनाबाह्य नियुक्त्यांच्या लाभार्थींच्या सहा वर्षांपैकी सुमारे तीन वर्षांचा अर्धा कालखंड निघून गेले असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून ही याचिका अविलंब निकालात काढण्यासाठी प्रयत्न न केल्यास त्यांचा उर्वरित काळही पार पडेल व ही याचिकाही निरर्थक ठरेल. महाराष्ट्र शासनाने या याचिकेत व डोंबिवली साहित्य संमेलनातील ठरावात म्हटल्याप्रमाणे साहित्य-कला-विज्ञान या क्षेत्रातील विधानपरिषदेतील नियुक्त्यांचा जो मोठा अनुशेष निर्माण झालेला आहे तो भरुन काढण्याचे तसेच या पुढील नियुक्त्या या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंच्याच केल्या जाण्याचे आश्वासन न्यायालयाला देत या प्रकरणाचा कायमचा निकाला लावावा. तशी मागणी डोंबिवली साहित्य संमेलनातही करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिंचा उचित सन्मान व्हावा असे वाटत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे काम करण्याचे मनापासून ठरवावे.
बऱ्याचदा साहित्यिक, कलावंत व अन्य क्षेत्रातील लोक सरकारसमोर बोटचेपी भूमिका घेतात. पाठीचा कणा नसल्यासारखे वागतात. त्यामुळेच त्यांची व त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची गळचेपी केली तरी आपले काही बिघडणार नाही अशी धारणा सरकारची झाली आहे का?
डॉ. श्रीपाद जोशी - साहित्यिक, कलावंत सरकारपुढे बोटचेपी भूमिका घेतात यात तथ्यांश नक्कीच आहे. पण सगळेच साहित्यिक, कलावंत तसे नसतात. आणिबाणिच्या विरोधात दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांसारखे साहित्यिक आपले मत ठामपणे मांडत होते. त्यांनी त्यापायी सरकारचा रोषही ओढवून घेतला होता. बोटचेप्या साहित्यिकांकडे न बघता आपण बाणेदार साहित्यिकांकडे बघून आपल्या भूमिका अधिक ठोसपणे मांडल्या पाहिजेत. ज्या क्षेत्रांमधून राज्यपालनियुक्त आमदार निवडले जातात, त्या क्षेत्रांमध्ये सध्या समाजहितासाठी झटणाऱ्या व मनापासून काम करु इच्छिणाऱ्या अशा अनेक दिग्गज व्यक्ती आहेत की त्यांची निवड करण्याने सरकारचाच सन्मान होईल. ज्या कलाकार व इतरांना विधिमंडळ कामकाज, समाजाची सेवा या गोष्टींशी काही देणेघेणे नाही त्यांना विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त म्हणून पाठविणे हा त्या संसदीय परंपरेचा अपमान आहे. तो टाळणे आपल्याच हाती आहे.
(शब्दांकन - समीर परांजपे)
---

Friday, June 23, 2017

गांधीवादी कार्यकर्ते पुंडलिक कातगडे यांच्या आत्मचरित्रातील `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या एका प्रकरणाचे होणार स्वतंत्र पुस्तक- समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २३ जून २०१७








दै. दिव्य मराठीच्या दि. 23 जून 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी केलेली विशेष बातमी. त्या बातमीचा मजकूर, जेपीजी फाइल व लिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/amravati-city/…/0/3/
---
गांधीवादी कार्यकर्ते पुंडलिक कातगडे यांच्या आत्मचरित्रातील 
`चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या एका प्रकरणाचे होणार स्वतंत्र पुस्तक
- मराठी साहित्यातील ग्रंथनिर्मितीत होतोय अशा प्रकारचा पहिलाच आगळा प्रयोग
- चंपारण्य सत्याग्रहाचे शताब्दीवर्ष सुरु असल्याने प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचा १ जुलै रोजी होणार प्रकाशन सोहळा
- समीर परांजपे
मुंबई, दि. २२ जून - बिहारमधील चंपारण्य येथे जुलमी ब्रिटिश निळ कारखानदारांच्या अन्यायाविरोधात महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचे यंदा शताब्दीवर्ष सुरु अाहे. या सत्याग्रहात सहभागी झालेले गांधीजींचे अनुयायी पुंडलिक कातगडे यांनी कालांतराने लिहिलेल्या आत्मचरित्रात चंपारण्य सत्याग्रहातील स्वत:च्या अनुभवांवर साठ पानांचे एक प्रकरणच आहे. `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या शीर्षकाचे हे प्रकरणच आता स्वतंत्र पुस्तकाच्या रुपात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान लवकरच प्रकाशित करीत आहे. यानिमित्ताने एखाद्या आत्मचरित्रातील एक प्रकरण निवडून त्याचेच स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याची घटना मराठी साहित्यात प्रथमच घडते आहे.
`चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतील ग्रंँट रोड येथील मुंबई सर्वोदय मंडळाच्या सभागृहात येत्या १ जुलै रोजी होणार अाहे. या पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनचे संचालक रामदास भटकळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे प्रा. श्रीराम जाधव व आंदोलन मासिकाच्या संपादिका सुनीती सु. र. हे वक्ते म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
यासंदर्भात गांधीवादी विचारांचे अभ्यासक व सर्वोदयी कार्यकर्ते जयंत दिवाण यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांचे कर्नाटकातील अनुयायी गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य म्हणजे पुंडलिक कातगडे. १९१६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मुंबई प्रांतिक परिषदेला लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी पंुडलिक कातगडे यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच वेळी गंगाधर देशपांडे यांच्या सांगण्यावरुन पुंडलिक कातगडे चंपारण्यात सेवेसाठी गेले. त्यावेळी त्यांचे वय २२ वर्षांचे होते. चंपारण्यात गांधीजींनी तीन आश्रम सुरु केले होते. त्यापैकी एक आश्रम भितीहरवा या गावात होता. या आश्रमात ११ महिने राहून कातगडे यांनी महत्वाचे कार्य केले. त्या परिसरातील एमेन या जुलमी निळकारखानदाराच्या विरोधात पुंडलिक कातगडे यांनी अभूतपूर्व लढा उभारुन स्थानिक गावकऱ्यांना संघटित केले. चंपारण्यातील संघर्षगाथेच्या आपल्या आठवणी पुंडलिक कातगडे यांनी १९५० साली `पुंडलिक' या आत्मचरित्रातील एका स्वतंत्र प्रकरणात लिहिल्या. हे प्रकरणच साठ पानांचे आहे.
मराठी साहित्यामध्ये एखाद्या आत्मचरित्रातील विशिष्ट प्रकरण निवडून त्याचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याची घटना कधी घडलेली नाही. `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या पुस्तकाच्या रुपाने तो नवा पायंडाही मराठी साहित्यात पडणार आहे.
पुंडलिक कातगडे यांची संघर्षगाथा
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्माजींचे पुढारपण कर्नाटकसिंह गंगाधरराव देशपांडे यांनी स्वीकारले. चंपारण्य सत्याग्रहात गंगाधर देशपांडे यांचे शिष्य पुंडलिक कातगडे सहभागी होते. गांधीजींनी खेड्याकडे चला आंदोलन सुरु केल्यानंतर गंगाधररावांनी हुदली नावाच्या खेड्यात जाणे येणे सुरु केले. त्यांच्याबरोबर पुंडलिक कातगडे देखील हुदलीस जाऊन राहू लागले. १९२९ साली जमनलाल बजाज यांच्याकडे कातगडे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण समितीचे चिटणीस म्हणून काम केले. कातगडे अविवाहित होते. १९३२च्या मिठाच्या सत्याग्रहात कातगडेंना कारावास भोगावा लागला होता. १९३४-३५ साली बिहारच्या भूकंपग्रस्त भागात कार्य करण्यासाठी महात्मा गांधींनी बोलाविल्यामुळे कातगडे तिथे गेले होते. १९४१च्या वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनात गांधीजींनी पुंडलिक कातगडेंची निवड केली होती. पण वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानूसार तुरुंगात न जाता त्यांनी बेळगाव जिल्हा विधायक समिती स्थापन केली होती. १९४२च्या लढ्यात कातगडेंना तुरुंगवास झाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी समग्र ग्राम सेवा समिती स्थापन केली. १९५९-६० सालानंतर हुदली गावातील समग्र ग्राम सेवेच्या कामातून पुंडलिक कातगडे स्वत:चे लक्ष कमी कमी करीत गेले. त्यानंतर त्यांनी भूदान आंदोलनात विशेष लक्ष घातले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही ते सक्रिय होते.

Tuesday, June 20, 2017

त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - दिनेश कानजी यांची मुलाखत : शब्दांकन - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २० जून २०१७



दै. दिव्य मराठीच्या २० जून २०१७ रोजीच्या अंकात मी शब्दांकन केलेली पत्रकार दिनेश कानजी यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. तिची लिंक, जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे आवश्यक आहे.
Epaper http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/20062017/0/10/
---
त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा
---
पत्रकार दिनेश कानजी यांची मुलाखत
---
(शब्दांकन - समीर परांजपे)
--
पूर्वांचलातल्या सात राज्यांपैकी त्रिपूरा हे एक राज्य. देशातील लहान राज्यांपैकी एक असलेले. पूर्वांचलातील इतर राज्यांबद्दल तुलनेने बरेच लिखाण झाले आहे तसे त्रिपूराबद्दल झालेले नाही. मराठीत त्रिपूरा या विषयावर असलेली पुस्तके तशी दुर्मिळच. त्यामुळे पत्रकार दिनेश कानजी लिखित `त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार - दृष्यम् आणि सत्यम्' या पुस्तकाला विशेष महत्व आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात सायंकाळी चार ते सहा या वेळेत होणार आहे. यानिमित्त या पुस्तकाचे लेखक दिनेश कानजी यांच्याशी केलेली ही बातचीत..
प्रश्न - त्रिपुरा या विषयावरच पुस्तक लिहावे असे का वाटले?
दिनेश कानजी - माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांच्याकडे एकदा मी त्रिपुराचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी ख्याती असलेले माणिक सरकार यांच्याबद्दल कौतुकाचे बोल काढले. त्यावर देवधर म्हणाले की, माणिक सरकार यांची जशी प्रतिमा आहे तशी ती प्रत्यक्षात नाही. त्यांचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष त्रिपुरामध्ये जाऊन ते बघणे आवश्यक आहे. तेव्हापासून हे माझ्या मनाने घेतले होते. यंदाच्या वर्षीच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातले काही दिवस असे मिळून सुमारे तीस दिवस त्रिपुरामध्ये जाऊन राहिलो. त्या राज्यातील ग्रामीण, शहरी अशा भागांमध्ये खूप भ्रमंती केली. लोकजीवन बघितले. त्याच भ्रमंतीची निरीक्षणे या पुस्तकात नोंदविली आहेत. त्रिपुरातील जनतेच्या नागरी प्रश्नांचा यात अनेक अंगांनी वेध घेतलेला आहे.
प्रश्न - `त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार - दृष्यम् आणि सत्यम्' असे या पुस्तकाचे शीर्षक देण्यामागचे काही खास प्रयोजन?
दिनेश कानजी - त्रिपूरामध्ये १९९३ सालापासून डाव्या आघाडीचे सरकार आहे. त्रिपूरातील त्यांचा राजकीय किल्ला अद्यापही अभेद्य आहे. १९९८ साली माकपचे नेते माणिक सरकार हे या राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेली १९ वर्षे ते त्रिपूराचे मुख्यमंत्री आहेत. या कालावधीत ज्या ज्या वेळेला त्रिपुरात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी डाव्या आघाडीला संपूर्ण बहुमत मिळालेले आहे. विरोधी पक्ष म्हणावे तितके प्रबळ नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्रिपूराचा संपूर्ण विकास करायला माणिक सरकार यांना काहीच अडचण येण्याचे कारण नव्हते. पण तरीही म्हणावा त्रिपुराचा विकास झाला नाही. माणिक सरकार हे स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी मानले जातात. पण ते काही खरे नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्रिपुरात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सामान्य माणसांचे प्रश्न तसे लोंबकळत आहेत. हे सारे त्रिपुरामध्ये केलेल्या भ्रमंतीत मला अनुभवता आले. तेथील भ्रष्टाचाराबद्दल बरीच माहिती मिळाली. माणिक सरकार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्रिपुरात जे अराजक माजले आहे तेच या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - त्रिपुरातील सामान्य माणसाच्या जीवनाचे तुम्हाला जे दर्शन घडले त्याबद्दल सांगा. 
दिनेश कानजी - पूर्वांचलातील राज्यांत ित्रपुरा हे प्रचंड राजकीय स्थिरता लाभलेले राज्य आहे. अतिशयोक्ती करत नाही पण त्रिपुरातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी पिण्याचे पाणी सहजी उपलब्ध नसल्याने शेवाळ साठलेल्या डबक्यांतील पाणी काढून ते पिण्याची वेळ सामान्य माणसांवर आली आहे. शहरांमध्येही पाणीपुरवठ्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. या पाण्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाण्यावर प्रक्रिया करुनच ते नागरिकांना पुरविले जाते. पण हे कामही धडपणे केले जात नाही. त्यामुळे लोहयुक्त पाण्यामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. गंडाखेरा भागातील काही गावांमध्ये मच्छरांचे थैमान इतके आहे की, रात्री लोक झोपू शकत नाहीत. शेकोट्या पेटवून जागे राहातात व न झालेली झोप सकाळी एक दोन तास झोपून पुरी करतात. माणिक सरकार यांच्या कारकिर्दीत सामान्य माणसांच्या या छोट्या समस्या तसेच रोजगारासारखे महत्वाचे प्रश्नही सुटू शकलेले नाहीत. त्रिपुराची ३८ लाख लोकसंख्या आहे. त्यातील सुमारे आठ ते नऊ लाख लोक आजमितीला बेकार आहेत. त्रिपुरात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याची दुसरी बाजू अशी की या राज्यात शेतकरी आत्महत्या करतच नाही असे नाही पण जे मरण पावतात त्यांच्या व्यवसायाची नोंद करण्याची तसदी इथले पोलिस कधीही घेत नाहीत. त्यामुळे खरी परिस्थिती समाजायला काही मार्गच नाही. हरयाणापेक्षा त्रिपुरामध्ये बलात्कारांचे प्रमाण कमी आहे असा हास्यास्पद दावा डाव्या आघाडीच्या एका आमदाराने केला होता. मात्र त्रिपुरात होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण हरयाणापेक्षाही जास्त आहे हे नंतर आकडेवारीवरुन सिद्ध झालेच.डाव्या पक्षाच्या एका आमदारावर आपल्या कर्मचाऱ्याच्या सात वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्रिपुरा पोलिसांनी फक्त एफआयआर नोंदविण्यापुरतीच कारवाई केली. त्रिपुरातील माणिक सरकार यांची १९ वर्षांची भ्रष्ट राजवट झाकून डाव्या पक्षांनी देशभरात त्रिपुराच्या बोगस विकास मॉडेलची भरपूर चर्चा घडविली. मनरेगासाठी मिळणारा निधी संपूर्णपणे खर्च करणारे राज्य म्हणून त्रिपुरा राज्याचा गौरव व्हायचा. पण आता जेव्हा या कामांचे नीटपणे परीक्षण सुरु झाले तेव्हा असे लक्षात येते आहे की, त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मनरेगाचा पैसा माकप व डावे पक्ष आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी खर्च करीत आहेत. तशी काही प्रकरणेही उजेडात आली आहेत. 
प्रश्न - माणिक सरकार यांच्या कारभाराबाबत या पुस्तकात काय निरीक्षणे मांडली आहेत?
दिनेश कानजी - रोझव्हॅलीसारख्या घपलेबाज चिटफंड कंपनीला सुरक्षा कवच देणाऱ्या, दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना पाठीशी घालणाऱ्या माणिक सरकार यांचे कर्तृत्व स्थानिक प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणले असताना राष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांची आरती ओवाळत आहेत. अशा मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे गरीबांचे मसिहा म्हणून जे मार्केटिंग सुरु आहे ते त्रिपुरामधील परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यानंतर किती खोटारडे आहे हे लक्षात आले. माणिक सरकार यांच्या कारभाराचा पंचनामा मी या पुस्तकात केला आहे. डाव्या पक्षांचा वैचारिक दुटप्पीपणा, देशविरोधी कारवाया उघड करणे, माणिक सरकार यांची बनावट प्रतिमा उद््ध्वस्त करणे आणि गेली अडीच दशके वामपंथी चरकात भरडल्या जाणाऱ्या त्रिपुरावासीयांच्या वेदना उर्वरित देशातील लोकांपर्यंत पोहचविणे हा या पुस्तकाचा मुळ उद्देश आहे.
प्रश्न - त्रिपुरामध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर आहेत, दहशतवादी संघटना आहेत, त्याशिवाय काही धार्मिक तणावाचे मुद्दे असतीलच त्याबद्दल सांगा.
दिनेश कानजी - देशाची फाळणी तसेच बांगलादेश युद्धाच्या वेळेस बांगलादेशातून (पूर्वीचा पूर्व पाकिस्तान) हिंदु व मुस्लिम निर्वासित भारतात आले. ते त्रिपुरातही लक्षणीय संख्येने आहेत. त्रिपुराच्या एकुण लोकसंख्येमध्ये आठ टक्के मुस्लिम आहेत. या राज्याची सुमारी ८०० हून अधिक कि.मी. ची सीमारेषा बांगलादेशला लागून आहे. या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी चालते. त्रिपुरात गांजाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. दस्तुरखुद्द माणिक सरकार यांच्या मतदारसंघातही ती होते. पण त्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्रिपुरात हिंदु-मुस्लिमांतील तणाव हा मुद्दाच नाही. तिथे शोषित व शोषक असाच महत्वाचा मुद्दा आहे. त्रिपुरात काही दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातील काहींचे लागेबांधे डाव्या पक्षांशी तर काहींचे काँग्रेसशी आहेत. त्रिपुरात भाजपला आजवर फार मते मिळत नसत. पण गेल्या वर्षांत झालेल्या काही निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी बरीच वाढलेली आहे. त्रिपुरातील भ्रमंतीत अशा सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण करुन तेच या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलेले आहे.
---

Monday, June 5, 2017

रशिया पुन्हा मैदानात - समीर परांजपे - दै. लोकसत्ता, १५ ऑगस्ट २००८

दै. लोकसत्तामध्ये असताना आठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखांपैकी काही लेख नेटवर आज अचानक गवसले. त्या चार लेखांपैकी हा एक लेख तो आहे १५ ऑगस्ट २००८ रोजी लिहिलेला. त्यामुळे त्या काळाचेच संदर्भ तत्कालीन ताज्या घडामोडींनूसार आहे एवढे मात्र हा लेख वाचताना लक्षात घ्यावे ही विनंती.
जॉर्जिया रशिया यांच्यादरम्यान गेल्या 8 ऑगस्ट २००८ रोजी लष्करी संघर्षाची ठिणगी पडली नंतर पाच दिवसांत रशियाने हे हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १५ ऑगस्ट २००८ रोजी दै. लोकसत्तामध्ये मी लिहिलेला हा लेख.
--
रशिया पुन्हा मैदानात
---
समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
शीतयुद्धाच्या काळामध्ये रशिया व अमेरिका यांच्या समर्थकांमध्ये जणू जग विभागले गेले होते. भारतासारख्या अलिप्ततावादी राष्ट्रांची भूमिका महत्वाची असली तरी व्यवहारात त्यांना फारशी किंमत देण्यात येत नव्हती. सोव्हिएत संघराज्य कोसळल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका हीच एकमेव महाबलाढ्य शक्ती उरली. अमेरिकेने अफगाणिस्तान, इराकवर हल्ले चढकिले. इराणला धमक्या देणे सुरू केले. अल काईदाच्या अतिरेक्यांनी अमेरिकेवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळेही जागतिक स्थितीत बरीच स्थित्यंतरे आली होती. या सर्व घडामोडींदरम्यान अमेरिकेला रशिया प्रभावी जाब विचारू शकला नव्हता. रशियातही गोर्बाचेव पायउतार झाल्यावर येलत्सिन राष्ट्राध्यक्षपदी आले पण ते फार प्रभावी ठरले नाहीत. येलत्सिन यांच्यानंतर अध्यक्ष बनलेल्या ब्लादिमीर पुतीन यांनी रशियाचे अंतर्गत प्रश्न सोडविण्यावर प्रथम भर दिला व त्यानंतर रशियाला पुन्हा बलाढ्य शक्ती म्हणून जगासमोर उभे करण्याचे कसोशीने प्रयत्न केले. हा सर्व पट डोळ्यांसमोर सरकला याचे कारण रशियाने जॉर्जियाच्या लष्करावर गेल्या ८ ऑगस्ट रोजी चढविलेले जोरदार हल्ले. शांती प्रस्थापित करण्याचा हेतू सफल झाल्याने हे लष्करी हल्ले थांबविण्याच्या निर्णयावर रशियाचे विद्यमान अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी १२ ऑगस्ट रोजी जाहीर केला. याआधी चेचन्याशीही रशियाचा असाच संघर्ष १९९४ ते १९९६ या कालावधीत झाला होता. त्यानंतर १० नोक्हेंबर २००० रोजी रशियाने चेचन्यावर पुन्हा हवाई हल्ले केले होते. चेचन्यावर केलेल्या हल्ल्यानंतर रशिया जॉर्जियाच्या निमित्ताने पुन्हा आक्रमक झाला व मैदानात उतरला. जॉर्जियावर हल्ला चढवून रशियाने आपण अमेरिकेच्या दबावाला भीक घालत नसल्याचेही साऱ्या जगाला दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय राजकारण परस्पराकलंबी तितकेच विरोधाभासीही असते. याचा प्रत्यय रशिया व जॉर्जिया यांच्या संबंधांमध्ये दिसून येईल. सोव्हिएत संघराज्याचा अस्त झाल्यानंतर जॉर्जिया एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. आज तेल, वायुसाठ्यांनी समृद्ध असलेला प्रदेश म्हणून जॉर्जियाची जगात ओळख आहे आणि त्यामुळेच अमेरिका, युरोप खंडातील देशांचे त्याकडे लक्ष आहे. जॉर्जियाच्या तेलसाठ्यांवर आपला अंकुश असावा याच दृष्टीने रशियाही कायम हालचाली करीत आला आहे. रशियाचा प्रभाव जॉर्जियाने नाकारण्यातूनच हा सर्व संघर्ष ओढविलेला आहे. दिवस ९ एप्रिल १९८९चा. जॉर्जियाची राजधानी तबिलीसीमध्ये शांततेने सुरू असलेली निदर्शने सोव्हिएत फौजांनी निघृणरीत्या चिरडून टाकली. उमाघलेसी साबचो (सुप्रीम कौन्सिल) या राष्ट्रीय लोकप्रतिनिधी गृहासाठी ऑक्टोबर १९९० मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी (सोव्हिएत संघराज्यात अनेप पक्षांचा समावेश असलेली ही पहिली निवडणूक होती) सोव्हिएत फौजांनी जॉर्जियात हे अत्याचार केले होते. त्यामुळे साहजिकच या निकडणुकांवर जॉर्जियातील काही पक्षांनी बहिष्कार टाकला व नॅशनल काँग्रेस या आघाडीची स्थापना केली. तर साम्यवादी विचारसरणीच्या विरोधातील काही पक्षांनी फ्री जॉर्जिया चळवळ सुरू केली. त्यामध्ये मेराब पोस्ताका, झकियद गमसनखुर्दिआ यासारखे नेते आघाडीकर होते. सोक्हिएत युनियनचा अस्त झाल्यानंतर जॉर्जिया ९ एप्रिल १९९१ रोजी ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून नकाशाकर अवतरले. स्वतंत्र जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष म्हणून झकियद गमसखुर्दिआ हे निवडून आले. मात्र त्यांच्याकिरुद्ध रक्तरंजित बंड झाले. २२ डिसेंबर १९९१ ते ६ जानेवारी १९९२ या काळात जॉर्जियाच्या बोकांडी बसलेले हे अराजक म्हणजे नॅशनल गार्डस् व मखेदिओनी या निमलष्करी संघटनेने रचलेल्या कटाचा भाग होता. या सर्वांच्या परिणामी १९९५ पर्यंत जॉर्जियामध्ये अत्यंत भीषण असा वांशिक संघर्ष उफाळून आला. १९९५ मध्ये एदुआर्दे शेवर्दनात्झे यांची जॉर्जियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. जॉर्जियातील अबखाझिया व दक्षिण ओस्सेटिया या दोन प्रांतांमध्ये फुटीरतावाद्यांत प्रथम लठ्ठालठ्ठी झाली आणि त्यानंतर त्याचे रूपांतर वांशिक संघर्षात झाले. या सर्व हिंसाचाराला रशियाचा पाठिंबा होताच. या संघर्षात अबरखाझिया भागातून अडीच लाखांहून अधिक जॉर्जियाच्या नागरिकांना १९९२ ते १९९३ या कालावधीत हुसकावून लावण्यात आले. त्याचवेळी तस्खिनकली भागातून जॉर्जियाच्या २५ हजार नागरिपांची हकालपट्टी करण्यात आली. दुसऱ्या बाजूस जॉर्जियामधील राजकीय अस्थिरता संपायला तयार नक्हती. २००३ मध्ये जॉर्जियाच्या अध्यक्षपदी असलेर्ले शेकर्दनार्त्झे यांची सत्ता किरोधी पक्षीयांनी ‘रेड रेक्होल्यूशन’च्या नावे हिसकावून घेतली. २००४ साली या देशाच्या अध्यक्षपदी मिखाईल सापाशकिली यांची निवड झाली. रेड रेव्होल्यूशनच्या परिणतीतून जॉर्जियातील लष्करी व आर्थिक क्षेत्रातील सुधारणांकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. जॉर्जिया सरकारचा अंमल पुन्हा अबखाझिया या स्वायत्त प्रदेशात कायम करण्यात सापाशकिली यांना यश आले. २००४ सालापासून अबखाझिया प्रांत वांशिक संघर्षाने वेढलेला होता, मात्र हीच समस्या असलेल्या दक्षिण ओस्सेटिया प्रांतात शांतता प्रस्थापित करणे जॉर्जिया सरकारला पठीण जात होते. याच सर्क घडामोडींमुळे जॉर्जिया व रशिया यांचे संबंध आणखी विकोपाला गेले. दक्षिण ओस्लेटिया व अबखाझिया प्रांतातील वांशिक संघर्षाला रशियाची फूस होती व दंगे घडविणाऱ्याांना शस्त्रे व पैशांची उघडपणे मदत केली जात होती. जॉर्जियातील रशियाच्या लष्कराचे बहुतांशी तळ बंद करण्यात आले होते. त्यातील शेवटचा तळ २००८ मध्ये बंद करण्यात आला. ८ ऑगस्ट २००८ या दिवशी चीनच्या बीजिंग शहरात ऑलिम्पिपचे शानदार उद्घाटन होत असतानाच, दुसऱ्या बाजूस दक्षिण ओस्सेटिया प्रांतावर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथे जॉर्जियाच्या लष्कराने प्रवेश केला. त्याला तीव्र आक्षेप घेऊन रशियन लष्कराने प्रतिचढाई केली व दक्षिण ओस्सेटियातून जॉर्जियाच्या लष्कराला हुसकावून लावले. सुमारे पाच दिवस रशियाच्या फौजांनी जोरदार हल्ले चढकिले. अखेर १२ ऑगस्टला रशियाने शस्त्रसंधी करीत असल्याचे घोषित पेले. दक्षिण ओस्सेटियामध्ये रशियाचे नागरिकही मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने त्यांच्या रक्षणासाठी ही कारवाई करण्यात आली होती असे, रशियाचे अध्यक्ष मेदवेदेव यांनी म्हटले आहे. जॉर्जिया व रशिया यांच्यात जुंपली असतानाच युरोपीय समुदाय व ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी अँण्ड को-ऑपरेशन (ओएससीई) तर्फे शांततेचा प्रस्ताव घेऊन फ्रान्सचे अध्यक्ष निपोलस सार्पोझी यांचे जॉर्जियामध्ये आगमन झाले, पण त्या आधीच रशियाने शस्त्रसंधी जाहीर केली. दक्षिण ओस्सेटियावर जॉर्जियाच्या फौजांनी पुन्हा आक्रमण करणार नाही, याची हमी द्यायला हवी. तसेच दक्षिण ओस्सेटिया व अबखाझिया या ‘रिपब्लिक्स’वर आक्रमण न करण्याचा करार जॉर्जियाने पाळायलाच हवा असे रशियाचे मत आहे. जॉर्जियाचे विद्यमान अध्यक्ष सापाशविली यांना अमेरिकेने खूप पैसा व शस्त्रे पुरविली आहेत. त्यातून जॉर्जियाच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यात येत आहे. सापाशविली हे लष्कराचा उपयोग वाईट हेतूंसाठीही करू शकतात, हे दक्षिण ओस्सेटियाकरील जॉर्जियाच्या आक्रमणावरून सिद्ध झाले. आता सापाशविली हे अमेरिकेच्या नियंत्रणात राहिलेले नाहीत अशी टीका रशियाने केली. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने रशियासोबतच्या भविष्यातील संयुक्त लष्करी कवायतींमधून अंग काढून घेतले आहे. तर जॉर्जियाने रशियाचे वर्चस्व असलेल्या कॉमनकेल्थ ऑफ इन्डिपेन्डन्ट स्टेटस् (सीआयएस)मधून अंग काढून घेतले आहे. या ठिकाणी रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर पेलेली टिकाही महत्त्वाची आहे. गोर्बाचेव यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, जॉर्जियाच्या उद्दामपणाला पाश्चिमात्य देशांनीच खतपाणी घातले आहे. दक्षिण ओस्सेटिया हा प्रदेश अमेरिकेपासून कित्येक हजार किलोमीटर दूर आहे, परंतु तरीही अमेरिकेची तेथील ढवळाढवळ संपत नाही. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळेच जॉर्जियाच्या लष्कराने दक्षिण ओस्सेटियामध्ये आक्रमण केले. रशियाला आक्रमणाची हौस नाही, मात्र आपल्या आजूबाजूच्या प्रदेशात काय घडते यात त्याला जरूर रस आहे. जगभरातील तेल व गॅसचा पुरवठा करणाऱ्यांपैकी जॉर्जिया हा एक महत्वाचा देश आहे. जॉर्जिया व रशियादरम्यान लष्करी संघर्ष सुरू होताच तेल व गॅसच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी भडकतील अशी भीती वाटत होती, परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे व सर्वाधिक इंधनाची गरज असलेल्या अमेरिका व प्रगत देशांचेही जॉर्जियावर लक्ष होते. जॉर्जिया व रशिया यांच्यातील लष्करी संघर्षातून अखेर काय साधले गेले? दक्षिण ओस्सेटिया व अबखाझियामधील वांशिक, राजकीय समस्यांवर कायमस्करूपी तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एक उत्तम संधी या संघर्षातूनच निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. १९९०च्या दशकातच जॉर्जियातून फुटलेल्या दक्षिण ओस्सेटिया व अबखाझिया या प्रांतांनी स्वयंघोषित राष्ट्र म्हणून दर्शविण्यास प्रारंभ केला. या दोन प्रदेशांतील रशियनांना रशिया आजही आपले नागरिकत्व देतो. जॉर्जियाच्या लष्पराविरोधात हल्ले चढवून रशियाचे विद्यमान अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव व पंतप्रधान ब्लादिमिर पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाचे महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. इस्राएल व हिजबुल्लाह यांच्या संघर्षात इस्राएल लष्करी बळाचा अराजकी वापर करीत आहे, अशी टिका रशियाने २००६ साली केली होती. मात्र आता जॉर्जियावर हल्ला चढवून रशियानेही इस्राएलसारखेच वर्तन केले आहे. दक्षिण ओस्सेटिया व अबखाझियामधील प्रश्न जेव्हा सुटतील तेक्हा सुटतील, पण रशिया आता पुन्हा मैदानात आला आहे

‘८८८८’चा प्रेरक उठाव - म्यानमारबाबत लेख - समीर परांजपे - दै. लोकसत्ता ८ ऑगस्ट २००८

दै. लोकसत्तामध्ये असताना आठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखांपैकी काही लेख नेटवर आज अचानक गवसले. त्या चार लेखांपैकी हा एक लेख तो आहे ८ ऑगस्ट २००८ रोजी लिहिलेला. त्यामुळे त्या काळाचेच संदर्भ तत्कालीन ताज्या घडामोडींनूसार आहे एवढे मात्र हा लेख वाचताना लक्षात घ्यावे ही विनंती.
----
‘८८८८’चा प्रेरक उठाव
---
- समीर परांजपे
---
म्यानमारमधील लष्करी राजवट संपुष्टात येऊन लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी या मागणीसाठी ८ ऑगस्ट १९८८८ रोजी यांगून (रंगून) येथे लोकशाहीवाद्यांनी प्रचंड निदर्शने केली. लष्कराने हे आंदोलन चिरडून टाकले. सुमारे तीन हजार लोकांचे बळी घेतले. तरीही म्यानमार जनतेने लोकशाहीसाठीचा लढा आजपर्यंत सुरू ठेवला आहे. ‘८८८८’ उठावाला आज वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्यानमारच्या राजकीय इतिहासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप... 
----
फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, रशियातील साम्यवादी राजवटीची स्थापना अशा घटनांनी जागतिप इतिहासाला कलाटणी दिली आहे. आशिया खंडाचा विचार पेला तर भारतामध्ये लोकशाही राजवटीने साठ वर्षे पूर्ण केली आहेत. पाकिस्तान, नेपाळमध्ये लोकशाही राजवट स्थिरावते आहे. अफगाणिस्तानात लोकशाही राजवट प्रायोगिक अकस्थेत आहे. भूतानमध्ये तेथील महाराजांनीच पुढाकार घेऊन सार्वत्रिक निकडणुका निर्भय वातावरणात पार पाडल्या. जपानमध्येही लोकशाही उत्तमरीत्या नांदते आहे. अपवाद फक्त साम्यवादी चीनचा; पण त्या देशानेही आता मुक्त बाजारपेठीय आर्थिक व्यवस्थेकडे वाटचाल सुरू पेली आहे. या सर्व देशांत सर्वात दुर्दैवी ठरला आहे तो म्यानमार... गेली अनेक वर्षे हुकुमशाहीच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या म्यानमारमध्ये तेथील लोकशाहीप्रेमी नागरिकांना निघृणपमे दडपण्यात येत आहे. याचे अत्यंत भेदक उदाहरण आहे, ८ ऑगस्ट 1९८८ रोजी म्यानमारमध्ये लोकशाहीकादी नागरिकांनी केलेला उठाव. 
दुसऱया महायुद्धाच्या काळात दक्षिणपूर्व आशियातील आघाडीवर म्यानमार (आधीचा बर्मा किंवा ब्रह्मदेश) हा ब्रिटिशांसाठी खूप महत्त्वाचा देश बनला होता. जपानी सैन्याने ब्रिटिश फौजांची दाणादाण उडवून म्यानमार काही काळापुरता जिंकला होता. या लढाईत ब्रिटिश सैन्यातील भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावली होती. ब्रिटिश सैन्याने चिवट झुंज देत जुलै १९४५ साली म्यानमारवर पुन्हा आधिपत्य प्रस्थापित केले. 
४ जानेकारी १९४८ रोजी म्यानमार स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. या देशाचे पहिले अध्यक्ष होते साओ शे थैप, तर यु नू हे पहिले पंतप्रधान झाले. पूर्वीच्या सर्व ब्रिटिश वसाहतींप्रमाणेच म्यानमार राष्ट्रकुलाचा सदस्य झालेला नक्हता. म्यानमारमध्ये पार्लमेंटची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये चेम्बर ऑफ डेप्युटीज चेम्बर ऑफ नॅशनॅलिटीज अशा दोन सभागृहांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांमधील म्यानमारचे कायमस्करूपी प्रतिनिधी व पंतप्रधानांचे माजी सचिक यू थांट हे संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल म्हणून १९६१ साली निकडले गेले. त्यांनी या पदावर दहा कर्षे काम केले. यू थांट हे सेक्रेटरी जनरल असताना आँग सान स्यू की या महिला नेत्यास संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
म्यानमारमधील लोकशाहीचा गळा घोटला गेला १९६२ साली. जनरल नेविन यांच्या नेतृृत्वाखाली लष्कराने बंड करून सत्ता काबीज केली. ‘समाजकादी राजवटी’च्या मुखवट्याखाली नेविन २६ वर्षे म्यानमारवर लष्करी वरवटा फिरवत होते. 1९६२ ते १९७४ दरम्यान, म्यानमारचा कारभार जनरल नेविनच्या नेतृत्वाखालील रेव्होल्युशनरी कौौन्सिलमार्फत चालविला जात होता. या देशातील उद्योग, प्रसारमाध्यमे व अन्य सेवांचे सरकारीकरण करण्यात आले होते. आपल्या हाती सत्ता एकवटावी या हेतूने जनरल नेविन व इतर वरिष्ठ अधिकाऱयांनी लष्करातील पदांचा त्याग करून नागरीपदांची ‘कस्त्रे’ परिधान केली. बर्मा सोशालिस्ट प्रोग्रॅम पार्टी स्थापन करून १९७४ ते १९८८ नेविन यांनी म्यानमारवर कथित ‘लोकशाही’ पद्धतीने पुन्हा निरंकुश सत्ताच गाजविली. म्यानमारमधील लष्करशाहीला तेथील लोकशाहीवादी नागरिक विरोध करीतच होते. ही आंदोलने बहुधा विद्यार्थी संघटना करीत असत. रंगून (आता यांगून) विद्यापीठात ७ जुलै १९६२ रोजी विद्यार्थ्यांनी लष्करशाहीविरोधी उग्र निदर्शने केली. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात १५ विद्यार्थी ठार झाले. यू थांट यांच्या अंत्ययात्रेच्या केळीही लष्करशाहीविरोधात झालेली निदर्शने दडपून टाकण्यात आली. १९७५, १९७६, १९७७ या तीन वर्षी लोकशाहीवादी विद्यार्थ्यांनी केलेली निदर्शने चिरडण्यात आली. या लढ्यात आँग सान स्यू की सहभागी झाल्या. पुढे त्या म्यानमारमधील लोकशाहीवादी जनतेच्या प्रेरणास्रोतच बनल्या. आँग सान स्यू की यांना लष्करशाहीने बंदीवासात टाकले. आँग सान स्यू की त्यामुळे खचल्या नाहीत. त्या अजूनही तितक्याच तडफेने लोकशाहीवाद्यांना प्रेरणा देत आहेत. 
म्यानमारमधील लोकशाहीवाद्यांनी मोठा लढा दिला तो ८ ऑगस्ट १९८८ रोजी. म्यानमारमधील स्थानिक नोटा चलनातून बाद परण्याच्या नेविन यांच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. त्यावेळी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी ठार झाला. या घटनेने सामान्य माणूस पेटून उठला. बौद्ध भिख्खूंपासून सर्वच क्षेत्रातील लोक नेविन सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यात सरकारी कर्मचारीही होते. ८ ऑगस्ट १९८८ रोजी यांगून येथे लष्कर राजवटीविरोधात शांततामय निदर्शनांना सुरुवात झाली. त्यानंतर इतर शहरांमध्ये सहा आठवडे ही निदर्शने सुरू होती.लोकशाहीवादी निदर्शकांनी दहा मागण्यांचे एक निवेदन सरकारला दिले. पण सरकारने आंदोलकांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले. मार्शल लॉ पुकारण्यात आला. लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन हजार आंदोलक मारले गेले. याच आंदोलनाच्या पाळात आँग सान स्यू की या राष्ट्रीय नेत्या झाल्या. ८ ऑगस्ट १९८८च्या या उठावावर १९९५ साली निर्मिलेला ‘बियॉण्ड रंगून’ हा चित्रपट निक्कळ अविस्मरणीय आहे. 
म्यानमारच्या सरकारने १८ जून १९८९ रोजी एक प्रस्ताव संमत करून त्याद्वारे आपल्या देशाचे ‘बर्मा’ हे नाव बदलून ‘म्यानमार’ असे पेले. राजधानी ‘रंगून’चे ‘यांगून’ असे नामकरण पेले. असे बदल होत असले तरी म्यानमारमध्ये अद्याप लोकशाहीला ग्रहणच लागलेले आहे. ‘८८८८’ उठावाला वीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लंडन येथील अॅंम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्क संघटनेने संयुक्त राष्ट्रांकडे नुकतीच एक मागणी पेली आहे. ‘८८८८’ उठावात सहभागी झालेल्यांपैकीी दोन हजार राजकीय कार्यकर्ते आजतागायत तुरुंगात खितपत पडले आहेत. या कार्यकर्त्यांची त्वरित मुवतता करण्यासाठी म्यानमार सरकारवर संयुव्त राष्ट्रांनी दबाव आणावा, असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे. या राजपीय कार्यकर्त्यांमध्ये ७८ वर्षांचे पत्रकार विन टीन हेही आहेत. 
‘८८८८’ उठावामुळे म्यानमारवरील आंतरराष्ट्रीय दडपणातही खूप वाढ झाली. म्यानमारच्या लष्करी राजवटीला मे १९९० मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणे भाग पडले. त्याआधी तीस वर्षांत अशा निवडणुकाच झालेल्या नव्हत्या. या निकडणुकीत आँग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने ४८९ पैकीी ३९२ जागा जिंकल्या. मात्र या निवडणुकीचे निकाल स्टेट लॉ अॅण्ड ऑर्डर रिस्टोरेशन कौन्सिलने ग्राह्य मानले नाहीत व आपल्या हातातील सत्ता सोडण्यास नकार दिला. १९९२ साली एसएलओआरसीने म्यानमारसाठी नवी राज्यघटना बनविण्याचे ठरविले त्या कामास ९ जानेकारी १९९३ रोजी प्रारंभही केला. दरम्यान, १९९७ मध्ये स्टेट लॉ अॅण्ड ऑर्डर रिस्टोरेशन कौन्सिलचे नामकरण स्टेट पीस अँण्ड डेव्हलपमेंट कौन्सिल असे करण्यात आले. २७ मार्च २००६ रोजी लष्करी राजवटीने म्यानमारची राजधानी यांगूनहून किनमाना (अधिकृत नाव नेइकईदाक) येथे नेली. म्यानमारमधील लष्करी राजवट देशातील लोकसंख्येपैकी आठ लाख जणांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेत असून, त्याकिरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याची घोषणा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केली होती. ऑगस्ट २००७ मध्ये म्यानमारमधील लष्करशाहीविरोधात पुन्हा निदर्शने करण्यात आली. १९ सप्टेंबर २००७ रोजी बौद्ध भिख्खूंसह दोन हजार लोकांनी सित्तवे शहरात मोर्चा काढला. २८ सप्टेंबर २००७ रोजी म्यानमार सरकारने इंटरनेटवर आणि पत्रकारांवरही निर्बंध लादले. एसडीपीसीने ७ फेब्रुवारी २००८ रोजी नव्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी सार्वमत घेण्याचे ठरविले. तसेच २०१० सालापर्यंत देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी गेल्या १० मे रोजी सार्वमताची प्रक्रिया पार पडली. पण खरे तर म्यानमारमध्ये अजूनही लोकशाही अस्तित्वात येण्याची चिन्हे नाहीत. म्यानमारला अलीकडेच वादळाने झोडपल्यानंतर सर्व देशांतून मदतीचे हात पुढे सरसावल्यावर म्यानमारच्या लष्करशहाने प्रथम अमेरिकेची मदत नाकारली. अशामुळे पुरेशी मदत न पोहोचल्याने म्यानमारच्या जनतेचे विलक्षण हाल झालेच. भारत, अमेरिका, चीन यांनी म्यानमारबाबत ‘सोयी’चीच भूमिपा आजवर घेतली आहे. आता तरी म्यानमारमधील लोकशाहीप्रेमी जनतेच्या डोळ्यांतील अश्रू आपल्याला दिसणार आहेत का? 
paranjapesamir@gmail.com

युवा मराठी साहित्य संमेलनाची `संगीतखूर्ची' - समीर परांजपे - दिव्य मराठी 2 जून 2017




दै. दिव्य मराठीच्या 2 जून 2017 रोजीच्या अंकात प्रस्तावित युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने माझा पुढील लेख प्रसिद्ध झाला होता.
-----
युवा मराठी साहित्य संमेलनाची `संगीतखूर्ची'
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
--
जसे प्रत्येक क्षेत्रात आहे, तसेच साहित्यामध्येही युवा पिढी काय लिहिते याकडे जगभरात सर्वत्र लक्ष दिले जाते. युवा पिढीच्या साहित्यातून जे शब्दांचे धुमारे फुटतात, त्याचा थेट परिणाम त्या देशाच्या भविष्यावरही होणार असतो. त्यामुळे अमेरिका, युरोपसह प्रगत देशांतील सरकारे, विद्यापीठे युवा साहित्य महोत्सव भरविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. भारतामध्येही युवा साहित्यासंदर्भात काही उपक्रम सुरु असतात. परंतु त्यांचे उद्दिष्ट साहित्यकेंद्री असले तरी बऱ्याचदा त्यात साहित्यबाह्य उचापतीच अनेक चालतात. कन्नड, तािमळ, बंगाली अशा काही भाषांमध्ये युवा साहित्यावर लक्ष देण्याची सत्प्रवृत्ती अधिक प्रबळ आहे. पण आपल्या मायमराठीची बातच काही और अाहे. मराठी साहित्य हे जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न उराशी बाळगणे चांगले आहे. पण त्यासाठी जे मुलगामी प्रयत्न करावे लागतात त्यात आपले मराठी साहित्यिक, वाचक, साहित्य संस्था व राज्य सरकार नेहमीच तोकडे पडत आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ साली तयार केलेल्या युवा धोरणात युवा मराठी साहित्य संमेलन घेण्याची तरतुद असूनही गेल्या पाच वर्षांत सरकारला एकही युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित करता आलेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या अख्यत्यारीत मराठी भाषा व साहित्य विषयक काम करणाऱ्या काही संस्था असताना त्यांना या संमेलनाचे आयोजक न करता युवा मराठी साहित्य संमेलनाचे घोंगडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून युवा मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत अलीकडच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला एक पत्र मिळाले. त्यामध्ये या संमेलनाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी यंदाही एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी मराठी साहित्य महामंडळाला निमंत्रण देण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपये देण्यात येतात. इतक्या रकमेत कोणतेही संमेलन आयोजित करणे शक्य नाही असे साहित्य महामंडळाचे म्हणणे आहे. २५ लाख रुपयांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच युवा मराठी साहित्य संमेलन अशा दोन्हींचे आयोजन करण्यात यावे अशी सरकारची अपेक्षा आहे का असाही सवाल महामंडळातील काही धुिरण करतात. 
राज्यात युवा मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा विचार रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री व मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी २०१४ साली बोलून दाखविला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे २०१५ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्रातील अनेक युवा लेखकांच्या अभिव्यक्तीसाठी वेगळे युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे असे प्रतिपादन केले होते. त्यानंतर युवा मराठी साहित्य संमेलन भरविण्यास राजी नसलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दोन वर्षापूर्वी तसे संमेलन घेण्यास काहीशी अनुकुलता दाखविली होती. त्यानुसार औरंगाबादमध्ये युवा मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण ते प्रत्यक्षात कधीच झाले नाही. 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इत्यादी संस्था हाताशी असताना त्यांना युवा मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यास महाराष्ट्र शासन धजावत नाही. आमच्याकडे संमेलनाचे आयोजन करण्याइतके मनुष्यबळ व अनुभव नाही असे अनौपचारिकरित्या सांगून महाराष्ट्र शासन या आयोजनाचे लष्टक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मागे लावून देण्याच्या प्रयत्नात दरवर्षी असते. यंदाच्या वर्षीही सरकारने तोच पवित्रा घेतला आहे. खरेतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने बुलडाण्यात २०१५ साली राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पण आपल्याच संस्थांच्या कार्यक्षमतेकडे शासन मुद्दामहून कानाडोळा करते अशी या संस्थांमधील अधिकाऱ्यांचीही तक्रार आहे. 
महाराष्ट्र सरकार व त्यांच्याशी संबंधित बाकीच्या संस्था युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याबाबत ठोस हालचाल करत नाहीत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व युवा मराठी सािहत्य संमेलन अशा दोघांसाठी किमान दरवर्षी दीड कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करीत नाहीत हे एका बाजूला निराशाजनक चित्र अाहे. मात्र दुसऱ्या बाजूला मराठी साहित्यिक, वाचकांपैकी मुठभर का होईना काही लोक खाजगी संस्थांच्या मदतीने त्यांच्या त्यांच्या परिघात युवा मराठी साहित्य संमेलने भरवितात, त्यात काही वेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वास्तवाचा एक अंतिम परिणाम असतो. २०१५ साली पुण्यामध्ये खासगी संस्थांनी पहिल्या अखिल भारतीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यानंतर यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात ‘अग्निपंख’ या संस्थेतर्फे दोनदिवसीय ‘युवा मराठी साहित्य संमेलन’ झाले. ही दोन्ही संमेलने युवकांच्या आकांक्षा जाणून घेण्यात यशस्वी ठरली होती. मात्र मराठी साहित्य विश्वात विविध संस्थांकडून जी युवा मराठी साहित्य संमेलने होतात त्यातील बहुतांशी संमेलनांतून कसदार युवा साहित्यिकांची पिढी पुढे आली आहे असेही फारसे आशादायक चित्र नाही. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकरी युवा साहित्य संमेलने होतात त्यात होणारे कार्यक्रम मात्र युवा साहित्यिकांना प्रेरणा देणारे असतात असा सूर साहित्यवर्तुळात आहे. साहित्य अकादमीतर्फे दोन दिवसांच्या युवा साहित्यिक संमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेथेही युवा साहित्यावर फार प्रकाशझोत पडला असे झालेले नाही. साहित्य अकादमीतर्फे महाराष्ट्रात दरवर्षी होणाऱ्या युवा संमेलनाचा आता एक साचा झाला आहे. या संमेलनातही काव्यवाचन, कथाकथन, मी आणि माझ्या पिढीचे साहित्य असेच ठरीव कार्यक्रम झाले. युवा पिढीही ही तंत्रज्ञानस्नेही आहे, तिच्या समोरील सामाजिक समस्यांचे स्वरुप मागील पिढ्यांपेक्षा खूपच वेगळे आहे. या वातावरणातून युवा पिढी जी साहित्यनिर्मिती करते त्याकडे युवा मराठी साहित्य संमेलनांमध्ये फारसे लक्ष देण्यात येत नाही अशी तक्रार युवा पिढीतील साहित्यिक करताना दिसतात. मराठी साहित्यात मुख्य प्रवाह, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य असे अनेक प्रवाह आहेत. या सर्व प्रवाहांना सामावून घेईल असे युवा मराठी साहित्य संमेलन दरवर्षी व्हायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने स्वत:च्या अख्यत्यारीतील मराठी भाषाविषयक संस्थांकडे या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी देऊन ते नीट पार पडेल याकडे लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्राचे पुस्तकाचे गाव उभारले म्हणजे युवा पिढी साहित्याकडे वळेल असे होत नाही. कारण आज तिला पुस्तकांव्यतिरिक्त अनेक आकर्षणे खुणावत आहेत. या युवकांना पुस्तकांपर्यंत आणण्यासाठी त्यांच्यातीलच समर्थ युवा लेखक त्यांच्यापुढे ठसठशीतपणे संंमेलनांसारख्या उपक्रमातून पुढे आणले पाहिजेत. तसेच या युवा संमेलनांचे सरकारीकरणही होता कामा नये. युवा धोरण नुसते आखून उपयोग नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी रेखीव प्रयत्नही हवेत. युवा मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्र सरकारकडून उत्तम आयोजन हे त्यातील पहिले पाऊल ठरावे.