गणराय आले आणि आता
वाजतगाजत पुन्हा आपल्या मुक्कामी निघालेत. गणेशोत्सव हा मन उल्हसित करणारा सण असला
तरी या गणेशमूर्ती बनविण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने व पदार्थ हे
पाण्यामध्ये, निसर्गघटकांमध्ये विघातक प्रदुषण निर्माण करीत आहेत. त्यातन
माणसाच्या अस्तित्वाचाही प्रश्न गंभीर होणार आहे. या विषयीचा लघुलेख मी दै.
सामनाच्या १९ सप्टेंबर २००२ च्या अंकात लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर
दिली आहे.
गणराय विसर्जनामुळे
पाणी `विषारी’ बनतेय...
-
समीर
परांजपे
-
गणराय
आले आणि आता वाजतगाजत पुन्हा आपल्या मुक्कामी निघालेत. गणेशोत्सव हा मन उल्हसित
करणारा सण असला तरी या गणेशमूर्ती बनविण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने व
पदार्थ हे पाण्यामध्ये, निसर्गघटकांमध्ये विघातक प्रदुषण निर्माण करीत आहेत.
त्यातन माणसाच्या अस्तित्वाचाही प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला
घातक नसलेल्या पदार्थापासून गणेशमूर्ती बनविल्यास बरेच प्रश्न सुटतील अशी चर्चा
यंदाच्या विसर्जनापासूनच पर्यावरणतज्ज्ञांनी सुरु केली आहे.
-
गणेशमूर्ती
बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टर आँफ पॅरिस हे पाण्यात चटकन विरघळत नाही.
त्याचप्रमाणे मूर्ती रंगविण्यासाठी वापरण्यात येणार्या रंगांमधील विषारी द्रव्ये विसर्जनाच्या
वेळी समुद्र, तलाव, नदी, विहिरीच्या पाण्च मिसळतात. लाल, निळा, केशरी, हिरवा या
रंगांमध्ये पारा, झिंक आँक्साईड, क्रोमियम, शिसे ही द्रव्ये असतात. ही द्रव्ये
मिसळलेले पाणी पिण्यात आले तर कर्करोग होण्याचाही संभव असतो. तीन वर्षांपूर्वी
ठाणे-डोंबिवली येथील तलावांमध्ये हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर तेथील
असंख्य मासे मरुन पडल्याची घटना उजेडात आली होती.
-
गणेशमूर्ती
बनविण्यासाठी प्लास्टर आँफ पॅरिस महाग पडते. म्हणून काही लोक चुनखडीचा वापर करतात.
या चुनखडीचा रासायनिक संयोग होऊन कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराईड अशी विषारी
द्रव्ये बनतात. ही घातक रसायने गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी पाण्यात मिसळून
तेथील प्राण्यांची जीवसृष्टी उद्ध्वस्त करतात. मुंबईमध्ये वांद्रे-वरळी सागरी
पुलाच्या प्रकल्पामुळे आधीच गिरगाव, दादर, मार्वेसारखे समुद्रकिनारे हळूहळू नष्ट
होऊ लागले आहेत. ७५०० गणेशमूर्तींचे वजन अंदाजे २० हजार किलो म्हणजे २० टन इतके
होते. यंदाच्या वर्षी सुमारे दीड लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल असा अंदाज
आहे. गणेशमूर्तींतील विषारी द्रव्यांमुळेही यंदाही किती जलप्रदुषण होणारे याचा
विचार करुन डोके चक्रावले.
-
दरवर्षी
मोठमोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यापेक्षा पाच ते दहा सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळांनी एकत्र येऊन उत्तम धातूपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे सामायिक पूजन
करावे. मूर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी तीच मूर्ती कायम ठेवावी अशी सूचना काही
पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविल्या गेल्यास
प्रदूषण काही प्रमाणात टळू शकेल असाही युक्तिवाद केला जातो. गणेशमूर्तींमुळेच केवळ
जलप्रदुषण होते असे नाही तर गणरायाच्या पूजनासाठी आणलेले हार-तुरे यांचे
निर्माल्य, सजावटीसाठी वापरलेला व पुनर्प्रक्रिया न होऊ शकणारा थर्माकोलही
विसर्जनाच्या वेळी पाण्यात सोडला जातो. या गोष्टींमुळे वाढते प्रदुषण रोखण्यासाठी
सजग उपाय करण्याची गरज आहे.
-
No comments:
Post a Comment