विक्षिप्तपणा व
विव्दत्ता या दोन परस्परविरुद्ध वृत्ती पुण्यामध्ये विस्मयकारकरित्या एकत्र
नांदतात. त्यातूनच अस्सल पुणेरी शैलीतील मराठी फलक जन्माला येतात. या फलकांचे
नमुने इंटरनेटच्या माध्यमातून आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. या
विषयावर दै. सामनामध्ये मी एक खास बातमी २७ एप्रिल २००१ रोजी केली होती. त्या
बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.
इथे `जोशी’ राहतात, इकडे-तिकडे
विचारत बसू नका!
-
समीर
परांजपे
-
विक्षिप्तपणा
व विव्दत्ता या दोन परस्परविरुद्ध वृत्ती पुण्यामध्ये विस्मयकारकरित्या एकत्र
नांदतात. त्यातूनच अस्सल पुणेरी शैलीतील मराठी फलक जन्माला येतात. या फलकांचे
नमुने इंटरनेटच्या माध्यमातून आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. पुणेकर हे जागतिक
कीर्तीस केव्हाच पोहोचले आहेत, पण त्यांच्या फलकांची जाहीर प्रसिद्धी हा त्यांना
मिळालेला एक नवा पैलू आहे.
-
आपल्या
इ-मेल खात्यावर रोजच्या रोज काही ना काही येत असते. मंदार पाध्ये या मित्राने
पाठविलेले पुणेरी फलक हे त्यात खूपच चमचमीत वाटलेय खास पुण्यामध्ये दुकाने, घरांवर
असणारे/ दिसणारे फलक या शीर्षकाखाली हे अस्सल नमुने
देण्यात आले आहेत. त्यातल्या मराठी फलकांच्या `पुणेरी’ मिसळीचा हा एक आस्वाद.
-
- पत्ता
सांगणे हा आमचा धंदा नाही. कृपया आम्हाला कुणाचाही पत्ता विचारु नका.
-
- इथे
जोशी राहतात. इकडे-तिकडे विचारत बसू नका.
-
- इथे
वाचण्यासाठी चष्मे मिळतात. पण तुमचे प्राथमिक शिक्षण झाले आहे ना?
-
- आमच्या
इथे सर्व भाषांमध्ये झेराँक्स काढून मिळतील.
-
- इथे
रातांबे, कोकम व परकर मिळतील.
-
- रंग
ओला आहे. विश्वास बसत नसेल तर हात लावून पाहा.
-
पुण्यातील
सदाशिव पेठ ही वस्ती म्हणजे अर्कट-तर्कट लोकांची बाजारपेठ आहे. तेथील जोग क्लासेस
इमारतीमध्ये लिहिलेले काही फलक पुढीलप्रमाणे आहेत.
-
- जास्त
वेळ बेल वाजवू नये. आम्ही विजेचे बिल भरतो. बेल वाजवून सुद्धा दार उघडले नाही तर
दाराची कडी वाजवू नये.
-
- येथे
आमच्या पद्धतीने शिकविले जाते. आमची पद्धत मान्य नसेल तर इथून कटावे. कटण्याचा
रस्ता (आणि या शब्दाखाली एकदिशादर्शक बाण काढलेला!)
-
पुण्याबद्दल
आणखी काही विनोद प्रसिद्ध आहेत. ते खरे की खोटे माहित नाहीत पण विनोद मात्र
प्रचलित आहेत!
-
-
पुण्यात पाऊस पडत असताना कोणाच्याही घरी गेलात तर विचारतात, `बाहेर पाऊस पडतोय. पाणी नकोच असेल तुम्हाला...’
-
- पाच
सेकंदांत झेराँक्स काढून मिळते. झेराँक्स दुकान इकडून पाच मिनिटांवर आहे!
-
-
दारावरची बेल तीनदा वाजवूनही दरवाजा उघडला नाही तर समजावे की, मालकांना आपल्याला
भेटावयाचे नाहीये!
-
पुण्यावर
अनेक किस्से प्रचलित आहेत. इंटरनेटवर सध्या इ-मेलव्दारे एक किस्सा घराघरांत
रुळलाय. एकदा एक मुंबईकर व पुणेकर यांच्यात आपापल्या शहरांच्या महत्वावरुन जोरात
वाद रंगला. वादामध्ये कधीही हार पत्करायची नसलेला पुणेकर मुंबईकराला म्हणाला `काय तुमची मुंबई...सगळीकडे गर्दी, घाण, लोकसंख्येचा
अव्वाच्या सव्वा आकार, वाहनांचा धूर. जरा म्हणून मनस्वास्थ्य नाही. त्याउलट आमचे
पुणे बघा. इथे किती नावाजलेल्या संस्था आहेत. संस्कृतीचे माहेरघर आहे. पुण्यात मोठी
माणसे जन्माला आली म्हणून तर आम्हाला जागतिक किर्ती मिळाली. पुण्यात फक्त मोठीच
माणसे जन्माला येतात. मुंबईत मोठी माणसे तशी कमीच आहेत.’
-
इतका
वेळ पुण्याची रडगाणी ऐकणारा मुंबईकर शेवटी मख्ख चेहेर्याने पुणेकराला म्हणाला `होय रे बाबा खरयं तुझं. पुण्यासारखे महान शहर
दुसरे नाही. पण तुला माहित नसलेला पुणे मुंबईतील एक फरक सांगतो. हे बघ, पुण्यामध्ये
फक्त मोठीच माणसे जन्माला येतात हे अगदी खरे असले तरी मुंबईमध्येही महिला बाळंत
होतात. पण आमच्याकडे फक्त छोटीच मुले जन्माला येतात!!!’
-
थोडक्यात
पुण्याची विक्षिप्त, विव्दान परंपरा आता इंटरनेटनेही ठळक केली आहे. पुण्यानजिक या
शहराचा इतिहास सांगणार्या सिटी म्युझियमचे उद्घाटन अलीकडेच शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरेंच्या हस्ते झाले. या म्युझियममध्ये `पुणेरी फलकांना’ खास स्थान मिळावे असे कोणालाही नक्कीच वाटेल
फक्त `पुणेकर’ सोडून!!
No comments:
Post a Comment