आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षात सह्याद्रीतील उपक्रमांचा मुहूर्त हा प्रस्तरारोहणाच्याच कार्यक्रमाने करावयाचा हे सँकने ठरविले होते. त्यानूसार नाशिक परिसरातील अत्यंत कठीण व दुर्गम अशा चार सुळक्यांवर सँकच्या गिर्यारोहकांनी प्रस्तरारोहण करुन त्यांचा माथा यशस्वीरित्या सर केला. सँकचे कुशल गिर्यारोहक संतोष निगडे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रस्तरारोहण पार पडले. हा लेख मी दै. सामनामध्ये १० फेब्रुवारी २००२ रोजी लिहिला होता.
नवरा-नवरी अन् घोड्याचा कडा
- समीर परांजपे
-
आंतरराष्ट्रीय पर्वत
वर्षानिमित्त महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांनी निसर्गरक्षण व गिर्यारोहणाच्या
प्रचार-प्रसारासाठी अधिक जोमाने कार्यरत व्हायला सुरुवात केली आहे. सह्याद्री
अँडव्हेंचर क्लबतर्फे (सँक) नुकतेच नाशिकमधील नवरा, नवरी, अन् घोड्याचा कडा हे
अवघड सुळके सर करण्यात आले. ही मोहिम म्हणजे वर्षभरातील आगामी मोहिमांच्या
रेलचेलींची नांदीच ठरावी. मुंबईतील सह्याद्री अँडव्हेंचर क्लब ही अनुभवी
गिर्यारोहकांची संस्था येत्या वर्षभर सह्याद्री पर्वतराजीतील निसर्गाचे रक्षण व
गिर्यारोहण प्रशिक्षण यासंदर्भात अनेक कार्यक्रम हाती घेणार आहे. या
कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज गिर्यारोहक तसेच राष्ट्रीय पातळीवरील
इंडियन माऊंटेनिअरिंग फेडरेशन (आयएमएफ) या संस्थेचेही सक्रिय सहकार्य या सर्व
प्रकल्पांत सँकला मिळणार आहे. सह्याद्रीतील उपक्रमांचा मुहूर्त हा प्रस्तरारोहणाच्याच
कार्यक्रमाने करावयाचा हे सँकने ठरविले होते. त्यानूसार नाशिक परिसरातील अत्यंत
कठीण व दुर्गम अशा चार सुळक्यांवर सँकच्या गिर्यारोहकांनी प्रस्तरारोहण करुन
त्यांचा माथा यशस्वीरित्या सर केला. सँकचे कुशल गिर्यारोहक संतोष निगडे यांच्या
नेतृत्वाखाली हे प्रस्तरारोहण पार पडले.
नाशिकपासून जवळ
असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संडे-१ हा २७५ फूट उंचीची सुळका सर करायला जरा अवघड
होता. संडे-१सह अंजनेरी येथील नवरा (२२५ फूट), नवरी (१२५ फूट), घोड्याचा कडा (१७५
फूट) असे चार सुळके विक्रमी कालावधीत सँकने सर केले. या प्रस्तरारोहण मोहिमेत आनंद
शिंदे, पाँल पेंटर, महेंद्र कुबल, चंद्रशेखर शिरसाट, दिनेश गोहिल, महादेव गायकवाड
हे गिर्यारोहक सामील झाले होते. सॅक ही संस्था आहे नवी, पण तिच्या
गिर्यारोहकांमध्ये अपार जिद्द आहे. या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षामधील
आणखी महत्वाच्या योजनांविषयी महाराष्ट्रातील अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली
आहे. सह्याद्री पर्वतराजीत प्रस्तरारोहण मोहिमा आयोजित करण्याचे प्रमाण सध्याच्या
काळात कमी होत चालले आहे. त्याऐवजी ट्रेक्स काढण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा
पार्श्वभूमीवर फक्त बोटावर मोजण्याइतक्याच गिर्यारोहण संस्था प्रस्तरारोहण मोहिमा
आयोजित करतात. सँकचे गिर्यारोहक या अव्वल संस्थांचे प्रतिनिधीत्व करतात. म्हणून
त्यांचे खास अभिनंदन!
No comments:
Post a Comment