लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा 2016 सालचा पुरस्कार मिळालेले लेखक मिलिंद चंपानेरकर यांची मी घेतलेली मुलाखत दि. 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या दै. दिव्य मराठीच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची ही जेपीजी फाइल व वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/27022017/0/4/
-----
अनुवादाच्या निमित्ताने शब्दगंध अनुभवला
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. सईद अख्तर मिर्झा यांच्या `अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर' या मुळ पुस्तकाचा 'लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ हा मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत केलेला अनुवाद खूपच गाजला. वाचकप्रिय झाला. या पुस्तकाचा अनुवाद करताना मिलिंद चंपानेरकर यांनी आपल्या मनात एक निश्चित भूमिका ठरविली होती. त्याची उकल त्यांच्या या मुलाखतीत झाली आहे.
प्रश्न - या पुस्तकाच्या अनुवादामागील नेमक्या प्रेरणा काय होत्या? अनुवादक-लेखक म्हणून सईद मिर्झाच्या मुळ पुस्तकातल्या कोणत्या घटकाने तुमच्यातल्या अनुवादकाला आव्हान दिले होते?
मिलिंद चंपानेरकर - ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ ही प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांची पहिलीच इंग्रजी साहित्यकृती. हे पुस्तक अनुवािदत करण्याआधी मी ए. आर. रेहमान याच्या एका पुस्तकाचा अनुवाद केला होता. त्याशिवाय मी काही अनुवादित पुस्तकांचे संपादनही केले होते. मात्र सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मराठीत अनुवादित करायलाच पाहिजे अशी प्रेरणा मिळाली. त्यातून त्या पुस्तकाचे `लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र' हा अनुवाद मी सिद्ध केला. सईद मिर्झा यांचे हे पुस्तक रुढार्थाने आत्मचरित्र नाही. त्या पुस्तकाचे नेमके स्वरुप काय हेच चिमटीत पकडता येत नाही. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना ‘द ग्रेप्स ऑफ राॅथ’ (Grapes of Wrath) ही जॉन स्टाइनबेक यांनी लिहिलेली इंग्रजी कादंबरी वाचनात आली होती. त्या कादंबरीने मी झपाटून गेलो होतो. त्यानंतर ३० वर्षांनी सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचून असाच झपाटून गेलो. हे पुस्तक मराठीत अनुवादित करायचेच हे मी मनाने घेतले. मिर्झा यांच्या पुस्तकाचा मी केलेला अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकावर विविध वयोगटातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. स्त्रीवाचकांनी दिलेला प्रतिसाद तर मोठा होता. ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या घटना येतात. १९३०च्या दशकातीलही वर्णनापासून ते समकालीन २००२च्या घटनांपर्यंत या पुस्तकात भाष्य केलेले आहे. आपण आईस पत्र लिहितो तेव्हा त्यात मार्दव असते. अनेक राजकीय-सामाजिक घटना वा भाष्य कितीही कटू असले, तरी एखादा आपल्या आईला त्याबाबत मार्दवानेच सांगतो – हीच कल्पना डोक्यात ठेवून लेखकाने अनेक गोष्टींचा उहापोह करण्यासाठी खास दीर्घपत्राच्या आकृतिबंधाची योजना केली आहे..जेणेकरून अत्यंत क्लिष्ट व कटू गोष्टींबाबत आईशी आणि पर्यायाने वाचकांशी मार्दवाने संवाद साधला जावा. या पुस्तकात दोन पात्रे कल्पिलेली असून सईद मिर्झा यांनी या पात्रांवर आपल्या आईवडिलांचे आरोपण केलेले आहे. पुस्तकाची लेखनशैली आईला दीर्घपत्र लिहिण्याची असून त्यामुळे त्यातील भाषेत अत्यंत मार्दव आहे. हे पुस्तक भाषांतरित करताना त्यातील मार्दव मराठीतही तसेच यावे म्हणून मी खूप काळजीपूर्वक शब्दांची निवड केली आहे आणि वाक्य रचनाही तो परिणाम साधला जाईल दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - `लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' हे पुस्तक पुरोगामीत्व, शास्त्रीय दृष्टीकोन आणि सेक्युलॅरिझम हा सहज स्थायीभाव असलेल्या एका आईची, तिच्या कुटुंबाची गोष्ट आहे. या गोष्टीला वैश्विक मुल्य आहे, ते अनुवादातून पुढे आणताना आपण वावरतो त्या आसपासच्या समाजाशी मनातल्या मनात तुलना होत गेली का? त्यातून जे हाती लागले ते काय होते?
मिलिंद चंपानेरकर - ग्रामीण बोलीभाषांमध्ये मार्दव असते. प्रमाण मराठी भाषा एेकताना, बोलताना एकप्रकारची करकर जाणवते. या भाषेत शब्दांची गोलाई खूप कमी असते. लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाचा अनुवाद करताना असे गोलाई असलेले शब्द आवर्जून निवडले व वापरले आहेत. सईद मिर्झाच्या मुळ इंग्रजी पुस्तकातील मार्दव मराठीत उतरावे यासाठी प्रयत्न करताना या अनुवादाचे पाच-पाच मसुदे तयार झाले. मुळ पुस्तकात उर्दू-पश्तू अशा भाषांतलेही शब्द होते. त्यांचे नेमके अर्थ मित्रांच्या मदतीने जाणून घेतले. या शब्दांचा जो शिडकावा मुळ कलाकृतीत आहे ते सौंदर्य अनुवादातही टिकवून ठेवण्यासाठी मी खास परिश्रम घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणाऱ्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! त्यामुळे ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र’ ही व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी एक आगळीच साहित्यकृती ठरते.
लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा 2016 सालचा पुरस्कार मिळालेले लेखक मिलिंद चंपानेरकर यांची मी घेतलेली मुलाखत दि. 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या दै. दिव्य मराठीच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची ही जेपीजी फाइल.अनुवादाच्या निमित्ताने शब्दगंध अनुभवला--- समीर परांजपेparanjapesamir@gmail.com---व्यापक जनजीवनाचे घडले दर्शन--लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. सईद अख्तर मिर्झा यांच्या `अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर' या मुळ पुस्तकाचा 'लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ हा मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत केलेला अनुवाद खूपच गाजला. वाचकप्रिय झाला. या पुस्तकाचा अनुवाद करताना मिलिंद चंपानेरकर यांनी आपल्या मनात एक निश्चित भूमिका ठरविली होती. त्याची उकल त्यांच्या या मुलाखतीत झाली आहे.प्रश्न - या पुस्तकाच्या अनुवादामागील नेमक्या प्रेरणा काय होत्या? अनुवादक-लेखक म्हणून सईद मिर्झाच्या मुळ पुस्तकातल्या कोणत्या घटकाने तुमच्यातल्या अनुवादकाला आव्हान दिले होते?मिलिंद चंपानेरकर - ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ ही प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांची पहिलीच इंग्रजी साहित्यकृती. हे पुस्तक अनुवािदत करण्याआधी मी ए. आर. रेहमान याच्या एका पुस्तकाचा अनुवाद केला होता. त्याशिवाय मी काही अनुवादित पुस्तकांचे संपादनही केले होते. मात्र सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मराठीत अनुवादित करायलाच पाहिजे अशी प्रेरणा मिळाली. त्यातून त्या पुस्तकाचे `लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र' हा अनुवाद मी सिद्ध केला. सईद मिर्झा यांचे हे पुस्तक रुढार्थाने आत्मचरित्र नाही. त्या पुस्तकाचे नेमके स्वरुप काय हेच चिमटीत पकडता येत नाही. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना ‘द ग्रेप्स ऑफ राॅथ’ (Grapes of Wrath) ही जॉन स्टाइनबेक यांनी लिहिलेली इंग्रजी कादंबरी वाचनात आली होती. त्या कादंबरीने मी झपाटून गेलो होतो. त्यानंतर ३० वर्षांनी सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचून असाच झपाटून गेलो. हे पुस्तक मराठीत अनुवादित करायचेच हे मी मनाने घेतले. मिर्झा यांच्या पुस्तकाचा मी केलेला अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकावर विविध वयोगटातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. स्त्रीवाचकांनी दिलेला प्रतिसाद तर मोठा होता. ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या घटना येतात. १९३०च्या दशकातीलही वर्णनापासून ते समकालीन २००२च्या घटनांपर्यंत या पुस्तकात भाष्य केलेले आहे. आपण आईस पत्र लिहितो तेव्हा त्यात मार्दव असते. अनेक राजकीय-सामाजिक घटना वा भाष्य कितीही कटू असले, तरी एखादा आपल्या आईला त्याबाबत मार्दवानेच सांगतो – हीच कल्पना डोक्यात ठेवून लेखकाने अनेक गोष्टींचा उहापोह करण्यासाठी खास दीर्घपत्राच्या आकृतिबंधाची योजना केली आहे..जेणेकरून अत्यंत क्लिष्ट व कटू गोष्टींबाबत आईशी आणि पर्यायाने वाचकांशी मार्दवाने संवाद साधला जावा. या पुस्तकात दोन पात्रे कल्पिलेली असून सईद मिर्झा यांनी या पात्रांवर आपल्या आईवडिलांचे आरोपण केलेले आहे. पुस्तकाची लेखनशैली आईला दीर्घपत्र लिहिण्याची असून त्यामुळे त्यातील भाषेत अत्यंत मार्दव आहे. हे पुस्तक भाषांतरित करताना त्यातील मार्दव मराठीतही तसेच यावे म्हणून मी खूप काळजीपूर्वक शब्दांची निवड केली आहे आणि वाक्य रचनाही तो परिणाम साधला जाईल दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रश्न - `लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' हे पुस्तक पुरोगामीत्व, शास्त्रीय दृष्टीकोन आणि सेक्युलॅरिझम हा सहज स्थायीभाव असलेल्या एका आईची, तिच्या कुटुंबाची गोष्ट आहे. या गोष्टीला वैश्विक मुल्य आहे, ते अनुवादातून पुढे आणताना आपण वावरतो त्या आसपासच्या समाजाशी मनातल्या मनात तुलना होत गेली का? त्यातून जे हाती लागले ते काय होते?मिलिंद चंपानेरकर - ग्रामीण बोलीभाषांमध्ये मार्दव असते. प्रमाण मराठी भाषा एेकताना, बोलताना एकप्रकारची करकर जाणवते. या भाषेत शब्दांची गोलाई खूप कमी असते. लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाचा अनुवाद करताना असे गोलाई असलेले शब्द आवर्जून निवडले व वापरले आहेत. सईद मिर्झाच्या मुळ इंग्रजी पुस्तकातील मार्दव मराठीत उतरावे यासाठी प्रयत्न करताना या अनुवादाचे पाच-पाच मसुदे तयार झाले. मुळ पुस्तकात उर्दू-पश्तू अशा भाषांतलेही शब्द होते. त्यांचे नेमके अर्थ मित्रांच्या मदतीने जाणून घेतले. या शब्दांचा जो शिडकावा मुळ कलाकृतीत आहे ते सौंदर्य अनुवादातही टिकवून ठेवण्यासाठी मी खास परिश्रम घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणाऱ्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! त्यामुळे ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र’ ही व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी एक आगळीच साहित्यकृती ठरते.प्रश्न - अनुवाद ही केवळ भाषेशी संबंधित प्रक्रिया नसते, तर या प्रक्रियेचा संबंध दोन समुहातले सौहार्द, सामंजस्य वृद्धिंगत करण्याशी असतो. अनुवादाने परस्परभिन्न संस्कृती परंपरांचे सेतू जुळतात. एक लेखक-अनुवादक म्हणून तुम्ही या प्रक्रियेकडे कसे पाहाता? अनुवादाच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षमतांबाबत काय निरीक्षण नोंदवाल विशेषत: आजच्या संदर्भात?मिलिंद चंपानेरकर - सईद मिर्झा हे चित्रपट दिग्दर्शक तसेच उत्तम पटकथाकार. मात्र हे पुस्तक लिहिताना त्यांनी एकच एक साचा स्वीकारलेला नाही. या पुस्तकात अफगाणिस्तान, बलुचिस्तानचे (क्वेट्टा) संदर्भ आहेत. त्या प्रांतातून १९३०च्या दशकात मिर्झा यांचे आईवडील मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील आधुनिकतेकडे कसे पाहिले असेल याचेही दर्शन पुस्तकातून होते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणाने हा देश भारलेला होता. त्या वातावरणात या दोघांनी आणि त्यांच्यासारख्या अनेकविध धर्मांच्या लोकांनी या धर्म निरपेक्ष नाव-लोकशाही देशाकडे कसे पहिले, कशा अपेक्षा ठेवल्या आणि निष्ठेने अशा नव्या देशाची राज्य घटनेत अभिप्रेत असलेली मुली स्वीकारली त्याच सूक्ष्म कथन या पुस्तकातून प्रतीत होते. `लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र'मध्ये रुपकात्मक लेखनशैली मिर्झा यांनी वापरलेली आहे. सर्वच धर्मांच्या भावभावनांचे चित्रण त्यांनी केलेले आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या घटनांवर जसे या पुस्तकात भाष्य आहे तसेच बाबरी मशिद पडल्यानंतर त्या घटनेकडे कसे पाहिले गेले याचाही धांडोळा त्यात आहे. या साऱ्या घटनांची एकच एक सलग कथा नाही. काही ठिकाणी संवाद आहेत. काही ठिकाणी स्वगत. अशा विविध लेखनपद्धतीतून हे पुस्तक पुढे पुढे जात राहाते. मी मुळ पुस्तक किमान ११ वेळा वाचलेले असल्याने त्यातील हे सारे बारकावे आता नीटसपणे सांगू शकतो. नेहरुप्रणित सेक्युलॅरिझमच्या पलीकडच्याही सेक्युलॅरिझम यातून ध्वनित होतो, असे माझे मत आहे. सईद मिर्झा म्हणतात की, आपण आधुनिक झालो आहोत काय ही गोष्ट जाणून घेण्यासाठी मला खूप उत्खनन करायचे आहे. ते या पुस्तकात त्यांनी केले अाहे. सईद मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक हे नक्कीच एका अर्थाने पॉलिटकल आहे. अगदी श्यामची आई हे या पुस्तकाला आईच्या मायेेचे अवगुंठन असले तरी तेही पुस्तक विशिष्ट हेतूने पॉलिटिकलच असते. किंबहुना प्रत्येक गोष्टीमागे असे काही हेतू असतातच. सईद मिर्झा मुळ पुस्तकामध्ये सांस्कृितक वेधही उत्तम प्रकारे घेताना दिसतात. आठव्या ते बाराव्या शतकात मुस्लिम व अन्य पौर्वात्य देशांतील विद्वान, कवी, लेखक, संत, शास्त्रज्ञ यांनी जे विचारधन मांडले त्यांचा मागोवा घेतानाच या विचारांतून कशी प्रगती झाली हेही मिर्झा पुस्तकात नमुद करतात. पाश्चात्य विचारवंतांपैकी जे साम्राज्यवादी होते त्यांनी या प्रगतीत मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले. त्यावर कोरडे ओढायला मिर्झा मागेपुढे पाहात नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेवर मिर्झा यांच्या अम्मीची विलक्षण श्रद्धा होती. आईवडिलांचे तरुणपण तसेच त्यानंतर जहाँआरा या तरुण जोडप्यावर आपल्या आईवडिलांच्या व्यक्तिरेखांचे केलेले आरोपण हे त्यांच्या मानसिकतेचा आलेख वाचकांसमोर उभा करते. सईद मिर्झांच्या पुस्तकाचा बाज हा निखळ निधर्मी आहे. प्रश्न - लेखन ही अंतिमत: एक राजकीय कृती असते. त्या दृष्टिकोनातून पाहता, तुमच्या अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं वर्णन तुम्ही कस कराल?मिलिंद चंपानेरकर - गेल्या काही वर्षांत मराठीत अनुवादित पुस्तकांची संख्या खूप वाढली आहे. मुळ पुस्तकाच्या लेखकाच्या अनुभवविश्वाच्या जवळ गेल्याशिवाय त्या पुस्तकाचे सार अनुवादात पूर्णांशाने उतरणार नाही. त्या पुस्तकाचा इसेन्स अनुवादात तितक्याच परिणामकारक रितीने उतरला तर त्याचा परिणाम खूपच गहिरा होतो. लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र हा अनुवाद सिद्ध करताना मी या गोष्टींचे पुरेपूर भान बाळगले आहे. या पुस्तकाचे मोल पुरेसे समजून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांनी हा तसा व्यावसायिक न ठरणारा प्रकल्प करण्यास स्वीकृती दिली, म्हणूनच हे अनोखे पुस्तक मराठी वाचकांसमोर येऊ शकले आणि म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि अर्थातच या प्रयोगशील पुस्तकाची ‘साहित्य अकादमी’ने दखल घेतली व त्याला सन्मान दिला म्हणून मला त्याचा अर्थातच मोठा आनंद आहे. ---माजिक, सांस्कृतिक क्षमतांबाबत काय निरीक्षण नोंदवाल विशेषत: आजच्या संदर्भात?
मिलिंद चंपानेरकर - सईद मिर्झा हे चित्रपट दिग्दर्शक तसेच उत्तम पटकथाकार. मात्र हे पुस्तक लिहिताना त्यांनी एकच एक साचा स्वीकारलेला नाही. या पुस्तकात अफगाणिस्तान, बलुचिस्तानचे (क्वेट्टा) संदर्भ आहेत. त्या प्रांतातून १९३०च्या दशकात मिर्झा यांचे आईवडील मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील आधुनिकतेकडे कसे पाहिले असेल याचेही दर्शन पुस्तकातून होते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणाने हा देश भारलेला होता. त्या वातावरणात या दोघांनी आणि त्यांच्यासारख्या अनेकविध धर्मांच्या लोकांनी या धर्म निरपेक्ष नाव-लोकशाही देशाकडे कसे पहिले, कशा अपेक्षा ठेवल्या आणि निष्ठेने अशा नव्या देशाची राज्य घटनेत अभिप्रेत असलेली मुली स्वीकारली त्याच सूक्ष्म कथन या पुस्तकातून प्रतीत होते. `लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र'मध्ये रुपकात्मक लेखनशैली मिर्झा यांनी वापरलेली आहे. सर्वच धर्मांच्या भावभावनांचे चित्रण त्यांनी केलेले आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या घटनांवर जसे या पुस्तकात भाष्य आहे तसेच बाबरी मशिद पडल्यानंतर त्या घटनेकडे कसे पाहिले गेले याचाही धांडोळा त्यात आहे. या साऱ्या घटनांची एकच एक सलग कथा नाही. काही ठिकाणी संवाद आहेत. काही ठिकाणी स्वगत. अशा विविध लेखनपद्धतीतून हे पुस्तक पुढे पुढे जात राहाते. मी मुळ पुस्तक किमान ११ वेळा वाचलेले असल्याने त्यातील हे सारे बारकावे आता नीटसपणे सांगू शकतो. नेहरुप्रणित सेक्युलॅरिझमच्या पलीकडच्याही सेक्युलॅरिझम यातून ध्वनित होतो, असे माझे मत आहे. सईद मिर्झा म्हणतात की, आपण आधुनिक झालो आहोत काय ही गोष्ट जाणून घेण्यासाठी मला खूप उत्खनन करायचे आहे. ते या पुस्तकात त्यांनी केले अाहे. सईद मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक हे नक्कीच एका अर्थाने पॉलिटकल आहे. अगदी श्यामची आई हे या पुस्तकाला आईच्या मायेेचे अवगुंठन असले तरी तेही पुस्तक विशिष्ट हेतूने पॉलिटिकलच असते. किंबहुना प्रत्येक गोष्टीमागे असे काही हेतू असतातच. सईद मिर्झा मुळ पुस्तकामध्ये सांस्कृितक वेधही उत्तम प्रकारे घेताना दिसतात. आठव्या ते बाराव्या शतकात मुस्लिम व अन्य पौर्वात्य देशांतील विद्वान, कवी, लेखक, संत, शास्त्रज्ञ यांनी जे विचारधन मांडले त्यांचा मागोवा घेतानाच या विचारांतून कशी प्रगती झाली हेही मिर्झा पुस्तकात नमुद करतात. पाश्चात्य विचारवंतांपैकी जे साम्राज्यवादी होते त्यांनी या प्रगतीत मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले. त्यावर कोरडे ओढायला मिर्झा मागेपुढे पाहात नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेवर मिर्झा यांच्या अम्मीची विलक्षण श्रद्धा होती. आईवडिलांचे तरुणपण तसेच त्यानंतर जहाँआरा या तरुण जोडप्यावर आपल्या आईवडिलांच्या व्यक्तिरेखांचे केलेले आरोपण हे त्यांच्या मानसिकतेचा आलेख वाचकांसमोर उभा करते. सईद मिर्झांच्या पुस्तकाचा बाज हा निखळ निधर्मी आहे.
प्रश्न - लेखन ही अंतिमत: एक राजकीय कृती असते. त्या दृष्टिकोनातून पाहता, तुमच्या अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं वर्णन तुम्ही कस कराल?
मिलिंद चंपानेरकर - गेल्या काही वर्षांत मराठीत अनुवादित पुस्तकांची संख्या खूप वाढली आहे. मुळ पुस्तकाच्या लेखकाच्या अनुभवविश्वाच्या जवळ गेल्याशिवाय त्या पुस्तकाचे सार अनुवादात पूर्णांशाने उतरणार नाही. त्या पुस्तकाचा इसेन्स अनुवादात तितक्याच परिणामकारक रितीने उतरला तर त्याचा परिणाम खूपच गहिरा होतो. लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र हा अनुवाद सिद्ध करताना मी या गोष्टींचे पुरेपूर भान बाळगले आहे. या पुस्तकाचे मोल पुरेसे समजून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांनी हा तसा व्यावसायिक न ठरणारा प्रकल्प करण्यास स्वीकृती दिली, म्हणूनच हे अनोखे पुस्तक मराठी वाचकांसमोर येऊ शकले आणि म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि अर्थातच या प्रयोगशील पुस्तकाची ‘साहित्य अकादमी’ने दखल घेतली व त्याला सन्मान दिला म्हणून मला त्याचा अर्थातच मोठा आनंद आहे.
---
No comments:
Post a Comment