बेहाल
नायजेरिया
-
समीर
परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
नायजेरियाच्या
उत्तर भागातील बोर्नो,
योबे
व अदमावा हे तीन धगधगते प्रांत
आहेत.
उत्तर
नायजेरियामध्ये स्वतंत्र
इस्लामी देश निर्माण करण्याचे
ध्येय उराशी बाळगून बोको हराम
या अतिरेकी संघटनेने या भागात
2009
सालापासून
नायजेरियाच्या सरकारी यंत्रणा
तसेच स्थानिक लोकांविरोधात
मोठय़ा प्रमाणावर घातपाती
कारवाया सुरू केल्या.
त्यामुळे
आजवर तेथील लाखो लोकांना
विस्थापित व्हावे लागले आहे.
आफ्रिका
खंडातील काही देशांचा अपवाद
वगळता बाकीचे देश शापिताचे
आयुष्य जगत आहेत.
त्यात
नायजेरियाचाही समावेश आहे.
निसर्गाची
अवकृपा ही कोणत्याही देशाच्या
प्रगतीला बाधा आणणे स्वाभाविक
असते.
मात्र
मानवनिर्मित आपत्तींमुळेही
देश कसा भकास होऊ शकतो,
याचे
नायजेरिया हे जिवंत उदाहरण
आहे.
नायजेरियाच्या
उत्तर भागातील बोर्नो,
योबे
व अदमावा हे तीन धगधगते प्रांत
आहेत.
उत्तर
नायजेरियामध्ये स्वतंत्र
इस्लामी देश निर्माण करण्याचे
ध्येय उराशी बाळगून बोको हराम
या अतिरेकी संघटनेने या भागात
2009
सालापासून
नायजेरियाच्या सरकारी
यंत्रणेविरोधात मोठय़ा प्रमाणावर
घातपाती कारवाया सुरू केल्या.
या
तीन प्रांतातील हजारो इस्लामेतर
धर्मियांना तेथून हुसकावून
लावण्याचे सत्रही या अतिरेकी
संघटनेने सुरू केले.
त्याच्या
परिणामी आजवर बोर्नो,
योबे
व अदमावा या प्रांतातून लाखो
लोक विस्थापित होऊन नायजेरियाच्या
अन्य भागांमध्ये आश्रयाला
आले आहेत.
ही
मानवनिर्मित आपत्ती इतकी
भीषण आहे की,
गेल्या
वर्षीपासून या तीन प्रांतांमध्ये
नायजेरियाचे विद्यमान अध्यक्ष
गुडलक जॉनाथन यांनी आणीबाणी
लागू केली.
बोको
हरामचे दहशतवादी उत्तर
नायजेरियातील गावे-शहरांवर
रॉकेट हल्ले चढवितात.
तेथील
इस्लामेतरांची घरेदारे जाळून
राख करतात.
या
महिन्यात बोको हराम अतिरेक्यांच्या
हल्ल्यातून मैदुगरी येथील
लष्करी छावण्याही सुटल्या
नाहीत.
बोको
हराम अतिरेक्यांच्या तावडीत
सापडूनही सहीसलामत सुटका
झालेल्या लितू या युवतीने
केलेले कथन अंगावर काटा आणणारे
आहे.
लितूने
म्हटले आहे,
‘गेल्या
वर्षी बोको हराम अतिरेक्यांनी
माझ्यासह दोन युवतींना पळवून
नेले.
11 दिवस
डांबून ठेवल्यानंतर त्यांनी
मला एका माणसाकडे नेले.
त्या
माणसाने मी मुस्लिम आहे की
ख्रिश्चनधर्मीय,
याबद्दल
चौकशी केली.
त्यानंतर
त्याने मला इस्लाम धर्म
स्वीकारण्याची गळ घातली.
त्याला
मी आवडले होते.
मुस्लिम
धर्म स्वीकारल्यास माझ्याशी
लग्न करण्याची त्याची इच्छा
होती.’
लितूला
काही दिवसांनी बोर्नो प्रांतातील
सांबियाच्या जंगलक्षेत्रात
अतिरेक्यांची जी छावणी होती,
तिथे
नेण्यात आले.
या
भागात बोको हरामच्या अतिरेक्यांनी
अक्षरश:
रक्ताचे
पाट वाहिले आहेत.
एकाही
मुस्लिम धर्मियाने सरकारी
नोकरी करायची नाही,
असा
या अतिरेक्यांचा फतवा आहे.
सरकारी
नोकरीत असलेल्या मुस्लिम
धर्मियाला अत्यंत निर्घृणपणे
ठार मारले जाते.
या
अतिरेक्यांसाठी काम करण्यास
नकार देणाऱयांचे धारदार
शस्त्रांनी गळे चिरले जातात.
बायका-मुले
यांचाही अपवाद केला जात नाही.
बोको
हराम अतिरेक्यांच्या तावडीत
लितू 15
दिवस
होती.
तिच्यासह
सहा बंदिवानांनी सुटकेसाठी
एक भन्नाट युक्ती केली.
अतिरेक्यांकडे
असलेल्या वाहनांपैकी एका
व्होल्क्स वॅगनमध्ये बसून
त्यांनी पलायन केले.
बोको
हराम अतिरेक्यांना हे लक्षात
येताच त्यांनी वॅगनचा पाठलाग
केला व पलायन करणाऱया सहा
जणांवर ते गोळीबार करीत होते.
व्होल्क्स
वॅगन बामा शहराच्या सीमेजवळ
आल्यावर अतिरेकी मागे फिरले.
वॅगन
सुरक्षित ठिकाणी पोहोचली
त्या वेळी लितू,
वॅगन
चालवणारा माणूस व अजून एक
व्यक्ती असे तिघेच जिवंत उरले
होते!
लितू
सुदैवी होती म्हणून जिवंत
राहिली;
पण
जे हजारो अश्राप जीव बोको
हरामच्या दहशतवादाला बळी
पडले,
त्यांची
तर गणतीच नाही.
बोर्नो,
योबे
व अदमावा या तीन प्रांतातून
जे विस्थापित नायजेरियाच्या
अन्य भागांत निर्वासित
छावण्यांमध्ये राहात आहेत
त्यांचे हाल तर कुत्रा खात
नाही,
अशी
अवस्था आहे.
पिण्याचे
पाणी,
शौचालय
अशा मूलभूत सुविधांची या
छावण्यांमध्ये तोकडी व्यवस्था
आहे.
गेल्या
दहा-बारा
वर्षांत बोर्नोमधून 13
लाख,
योबेमधून
7
लाख
70
हजार,
तर
अदामावामधून दहा लाख लोक
विस्थापित झालेले आहेत.
मुळात
हे तिन्ही प्रांत नायजेरियातील
सर्वात अविकसित भाग आहेत.
पोटाची
खळगी भरण्याइतकाही रोजगार
मिळत नसल्यामुळे तेथील
लोकांमध्ये असंतोष धुमसत
होता.
त्यातच
त्यांची माथी विषारी धर्मप्रचार
करून भडकावली गेली.
असंतुष्ट
लोकांनी शस्त्रZ
हाती
धरून दहशतवादाचा मार्ग पत्करला.
बोको
हराम संघटनेला नेमके हेच हवे
होते.
धर्म
ही अफूची गोळी आहे,
हे
कार्ल मार्क्सचे विधान
नायजेरियातील या तीन प्रांतांच्या
स्थितीकडे पाहून पटते.
नायजेरियातील
ज्या भागांत बऱयापैकी विकास
झालेला आहे,
तेथेही
उत्पात घडवण्याचा बोको हराम
अतिरेक्यांचा डाव आहे.
नायजेरियात
उद्योगधंदा,
नोकरीसाठी
अनेक भारतीय गेलेले आहेत.
त्यात
अनेक मराठी माणसांचाही समावेश
आहे.
काही
भारतीय नागरिकांच्या तीन-तीन
पिढय़ा नायजेरियात राहिलेल्या
आहेत.
बोको
हराम अतिरेक्यांच्या कारवायांमुळे
नायजेरियात भविष्यात प्रचंड
उलथापालथी झाल्या तर त्याची
भारत सरकारलाही गांभीर्याने
दखल घ्यावी लागेल.
नायजेरियाचे
विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथन
हे बोको हराम अतिरेक्यांचा
मुकाबला किती खंबीरपणे करतात,
यावरच
त्या देशाचे भवितव्य अवलंबून
आहे.
No comments:
Post a Comment